अधिकार दाखविण्यापेक्षा कर्तव्यावर लक्ष केंद्रित करा – डॉ.विशाल नेहूल

धारणी प्रजामंच,17/11/2018

धारणी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांचे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे स्थानांतर झाल्याने भव्य निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले, धारणीचे तत्कालीन ठाणेदार किशोर गवई यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळी भव्य निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता, ती उत्कृष्ट सुरुवात असल्याने परंपरा कायम ठेवून उपविभागीय अधिकारी डॉ.विशाल नेहूल यांना सुद्धा त्याच धरती वर निरोप सोहळा आयोजित करून सम्मानित करण्यात आले, यावेळी मंचावर सत्कारमूर्ती उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल, तहसीलदार आदिनाथ गांजरे, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख सेवानिवृत्त ठाणेदार किशोर गवई, धारणीचे ठाणेदार विलास कुलकर्णी  चिखलदराचे ठाणेदार शिंदे, अचलपुरचे ठाणेदार आधारसिहं सोनोने, परतवाड़ाचे ठाणेदार ठाकरे उपस्थित होते, यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले, सत्कारमूर्ती डॉक्टर विशाल नेहूल यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले की, अधिकार दाखवण्यापेक्षा कर्तव्यावर लक्ष केंद्रित करून खेळीमेळीच्या वातावरणात जनतेचे प्रश्न सोडविणे अधिक महत्वाचे समजून काम केले. धारणी माझ्यासाठी नवीन असतांना पोलीस विभागातील भरपूर बाबी शिकायला मिळाल्या हे माझे भाग्य समजतो, मी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक किशोर गवई यांना गुरू मानतो, त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले हे प्रसंग अतिशय माझ्यासाठी मोलाचे आहे, प्रथम नियुक्ती मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागात झाल्याने मी नाराज होतो, मात्र कर्तव्य बजावत असतांना खूप काही शिकायला मिळाले मला या धारणीने शिकण्याची संधी दिली, माझ्या अंगात नेतृत्वगुण बळकटीकरणास मेळघाटचे मोठे योगदान आहे, आपल्या निरोप समारंभाच्या संभाषणातून पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी यांना संदेश देतांना सांगितले की, शुल्लक फायद्यासाठी आपल्या चरित्रावर डाग लागू देवू नका, एक वेळा चरित्र डागाळल्याने पोलीस विभागात बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो, त्यामुळे आपले चरित्र स्वच्छ ठेवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा, अचलपूरचा अतिरिक्त प्रभार आल्या आल्या सांभाळला तेव्हा तेथील स्थानिक निवडणुकीमुळे मला खूप अनुभव आलेत, यावेळी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भरपूर शिकायला मिळाले व  मार्गदर्शन लाभले. दोन वर्षाच्या कार्यकाळात धावपळ अधिक झाली असली तरी खूप काही शिकायला मिळाले. दोन वर्षाच्या कार्यकाळात जे काही शिकायला मिळाले त्याच्या आधारावरच आज मला पोलीस विभागात अ श्रेणीचे व उत्कृष्ट असे पोलीस विभागाकडून शेरे मिळालेत, सर्व काही मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागात सेवा दिल्याने यश संपादन झाले,या मेळघाटचे माझ्यावर ऋण असल्याचे सांगत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल नेहूल  गहिवरून आले.

धारणी पोलिस स्टेशन, पोलीस निरीक्षक,पोलीस उप-निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, द्वारपाल, आणि पोलीस कर्मचारी यांच्याकडून विशाल नेहूल यांना जीप मध्ये बसवून रथाप्रमाणे मुख्य व्दारापर्यंत जीपला दोरीत बाधून ओढत निरोप सोहळा पार पडला.  

या कार्यक्रमाला मेळघाटसह धारणी शहरातील प्रतिष्ठीत नागरिक,राजकीय पदाधिकारी, समाजसेवक,धारणी तालुका पत्रकार संघ अध्यक्ष दिपक मालविय, उपाध्यक्ष सौ. दुर्गाताई बिसन्दरे,श्याम पांडे, पंकज लायदे, ,रमेश मालविय,प्रतीक मालविय, श्रमिक पत्रकार संघ अध्यक्ष रवी नवलाखे, सुलेमान मेमन,शेख मलिक, भाजप अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, शिव सेना मा.तालुकाध्यक्ष राजू राठोड, नगर पंचायत उपाध्यक्ष सुनील चौथमल,वर्षा जैस्वाल, वन्दना जावरकर, सौ. अरुणा भावसार, यांच्यासह शेकडो नागरिक, कर्मचारी उपस्थित होते,कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र गावंडे यांनी केले .