धारणी राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष करतो अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल !

धारणी प्रजामंच,14/11/2018
धारणी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रकार राष्ट्रवादी कांग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष करत असल्याचे धक्कादायक बाब समोर आली असून ही बाब पक्षासाठी अतिशय खेदाची व लाजिरवाणी आहे.

सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवस अगोदर धारणी राष्ट्रवादी कांग्रेसचे  युवक तालुकाध्यक्ष दीपक नागले याने आपल्या लेटरपॅडवर एका वनपरिक्षेत्राधिकारीची तक्रार केली होती मात्र त्या तक्रारीत तब्बल सात मजुरांच्या  खोट्या सह्या करून निवेदन दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे, ही घटना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासाठी तालुक्यात घातक असून युवक अध्यक्ष पक्षाची प्रतिमा मलीन करीत आहे,

या विषयी अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केले असता, धारणी राष्ट्रवादी कॉंग्रेस युवक अध्यक्षासाठी हा प्रकार काही नवीन नसून आपल्या पदाचा दुरुपयोग करत असल्याची चर्चा आहे, अधिकाऱ्याला प्रथम धमकाविणे जर एकले नाही तर नंतर त्या अधिकाऱ्याची खोटी तक्रार करून दबाव बनवून मग त्या अधिकाऱ्याकडून आर्थिक मागणी करण्याचा महाप्रताप युवक अध्यक्ष करत असल्याचे नाव न सांगण्याचा अटीवरून काही अधिकारी कर्मचारी यांनी माहिती दिली,हरिसाल येथील वन परिक्षेत्र अधिकारी यांची तक्रार आर्थिक लालसेपोटी केली असावी अशी शक्यता नाकारता येत नाही, कारण केलेल्या तक्रारीत ७ मजुरांच्या खोट्या सह्या असल्याची बाब उघड झाली, अधिकाऱ्यांच्या खोट्या तक्रारी करून त्यांना ब्लॅकमेलिंग करण्याची चर्चा आता रंगू लागली आहे, यामुळे तालुक्यात पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रकार राष्ट्रवादी कॉंग्रेस युवक तालुका अध्यक्ष दीपक नागले करत असल्याचे नाकारता येत नाही, कर्मचारी अधिकार्‍यांना ब्लॅकमेल करण्यात येत असल्याची चर्चा हरिसाल या गावातून ऐकायला मिळाली हा सर्व प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू असून राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका युवक अध्यक्ष आपल्या पदाचा गैरवापर करून लोकांची फसवणूक करण्याचा प्रकार करतो असे असतांना सुद्धा पक्षश्रेष्ठी अशा ब्लॅकमेलिंग करणाऱ्या युवक तालुकाध्यक्षाला पाठीशी का घालत आहे अशी चर्चा आता जनतेकडून ऐकायला मिळत आहे.