धारणी येथील रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर पोलीस कार्यवाहीची गाज

धारणी प्रजामंच,13/11/2018

धारणी येथील व्यापाऱ्यांनी डोक्याला गहाण ठेवून अगदी रस्यांवर आणून माल ठेवण्याचा बेकायदेशीर प्रकाराला धारणी पोलिसांनी उधळून लावल्याचे दृश्य शहरात बघायला मिळाले, सध्या धारणी शहराच्या रस्ता दुभाजकासह नूतनीकरण सुद्धा सुरु आहे असे असतांना मात्र शहरातील व्यापाऱ्यांनी चक्क रस्त्यावर अतिक्रमण करून रहदारीला बाधा आणण्याचे काम सुरु केल्याचे चित्र धारणी पोलिसांच्या लक्षात आल्याने नगर पंचायत प्रशासनाच्या सहकार्याने मागील दोन दिवसापासून धारणी पोलिसांनी या रस्त्यावर समान ठेवून अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कार्यावाही सुरु केली आहे, काही व्यापाऱ्यांनी आपले आधीच उचलून घेतले तर ज्या व्यापाऱ्यांनी आपले समान उचलण्यास दिरंगाई केली त्याचे रस्त्यावरील समान पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांच्या उपस्थित जप्त करून नगर पंचायतला जमा करण्यात आले असून या सर्व दोषी व्यापाऱ्यांवर नियमानुसार दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती आहे, अनेक वर्षापासून व्यापारांनी आपली अरेरावी करीत अगदी रस्त्यावर अतिक्रमणाचा सपाटा सुरु ठेवला होता त्यावर पोलीस कार्यवाहीची गाज पडल्यानंतर रस्त्यावरील अतिक्रमण संपुष्टात आले.