धारणी येथे उज्ज्वल भविष्य आयोजित आदिवासी लोकनृत्य स्पर्धा कार्यक्रम संपन्न

धारणी प्रजामंच,13/11/2018 

धारणी येथील रंगभवन मैदानावर उज्ज्वल भविष्य या संस्थेकडून भव्य आदिवासी लोकनृत्य स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,या आदिवासी लोकनृत्यामध्ये गदली या लोकनृत्याचा समावेश होता, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी १००० रुपये प्रवेश फी आकारण्यात आल्याने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नई दिल्ली, शाखा धारणी यांनी फी आकारणीला विरोध केल्यामुळे अखेर आयोजकांनी प्रत्येक चमूला स्पर्धेत मोफत प्रवेश देण्याचे ठरविले, आदिवासी लोकनृत्यामध्ये सहभागी झालेल्या धारणी तालुक्यातील बेरदाबल्डा येथील चमूने उत्कृष्ट लोकनृत्य सादर केल्यामुळे प्रथम पुरस्कार ११,००० रुपये रोख देण्यात आले तर दुय्यम पुरस्कार मांडू येथील लोकनृत्य करणाऱ्या चमूने ५००० रुपये रोख बक्षीस पटकविले, कार्यक्रमाच्या आयोजनात भाग्यश्री काळे, दीपक पंडोले,राजेंद्र सेमलकर,शोएब मेमन,दुर्योधन जावरकर,कमलेश काळे,गणेश गायन,मुकेश मालवीय आदींचा समावेश होता.