आदिवासींचे दैवत दसऱ्याच्या दिवशीच येतात जमिनी बाहेर

धारणी प्रजामंच,22/10/2018

मेळघाट आदिवासी जमाती पैकी कोरकू हि जमात बहुसंख्यांक असून आदिवासींची संस्कृती ही निसर्गाशी अती निगडीत असल्याचे अनेक अनेक पुरावे मिळतात, धारणी येथे नुकतेच आदिवासी कोरकू समाजाचे दसरा पूजन आटोपले,मेळघाटातील खेड्यात फक्त या दसरा पूजनात आदिवासीच असतात असे नाही तर आदिवासी गैरआदिवासी असे सर्वच समाजातील लोक या पूजनात सामील होतात असे हि काही ठिकाणी बघायला मिळाले,

आदिवासी मधील कोरकू या जमातीचे देव व दैवत ही वर्षातून एकदाच बाहेर काढण्यात येतात,गाव शिवारात मोठ्या झाडाखाली एका खड्यात या सर्व देवांना पुरून ठेवण्यात येते,आणि वर फक्त खेडादेव हेच असतात,ही पूजा अतिशय साधी असते. धारणी येथे आदिवासींच्या दसरा पूजन कार्यक्रमाची विशेष माहिती प्रजामंच वृत्तपत्राने संकलीत केली,कार्यक्रमात गाव भूमका आडा पटेल यांना विशेष करून प्रधान्य क्रम दिला जातो,धारणी येथील सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कार्यालयासमोर असलेल्या एका झाडाच्या बुडाखाली गाडलेले आपले सर्व देव दैवत दसऱ्याच्या दिवशी बाहेर काढले, बडी संजय माय, छोटी संजय माय, चीटी माय, डायन माय गोदल माय,गोदली माय, खेळादेव, मुठवा बाबा,आदी परंपरागत आदिवासीच्या संस्कृतीत सामाविष्ठ असलेल्या देवांखेरीज महादेव-पार्वती,  ब्रह्मा-विष्णू-महेश व इतरांची पूजा करण्याचा प्रघात आहे, झाडाच्या खोडातून बाहेर काढण्यात आलेल्या सर्व देवतांना स्वच्छ करून त्यांचे पूजन करून पुन्हा त्यांना त्याच खड्ड्यात आत ठेवण्यात आले यावेळी खेडादेव, बाघदेव यांना एक कोंबडा आणि कोंबडी यांची बळी देऊन पूजन केले जाते, त्यानंतर गावात असलेल्या मुठादेव यांची ही पूजा केल्या जाते,

आदिवासी जमातीतील कोरकू या जमातीचे आडनाव ही सर्व विविध झाडे अथवा निसर्गातील वनस्पती यांच्या नावाशी  साम्य असल्याचे अनेक वेळा लक्षात आले असे असताना आदिवासी संस्कृती ही निसर्गाला मानणारी आहे निसर्गाचे रक्षण आपले कार्य हे आपले कर्तव्य समजतात, डॉक्टर रवी पटेल यांनी कोरकू आदिवासी जमातीच्या या संस्कृतीबद्दल प्रतिक्रिया देतांना सांगितले की, खेळादेव गावाबाहेर राहतो त्यांच्या वर गावाची रक्षा करण्याची जबाबदारी असते, तर गावात असलेल्या मुठवा बाबा हे गावातील असलेल्या सर्व देवांचे प्रमुख असतात, दसऱ्याच्या पूजनाची जबाबदारी गावातील भूमकावर असून काही थोडेफार रक्कम वर्गणी करून हा उत्सव सण साजरा करतात,खेळादेव येथे पूजन संपल्यावर तेथेच एकमेकांना झेंडूची फुल देऊन एकमेकांना गळा भेटी घेवून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जाते, हा सण अतिशय आकर्षित करणारा असतो, विजयादशमीला हा सण साजरा करण्याचा जवळपास प्रघात आहे, यावरून आदिवासी हे निसर्गाशी किती जवळ आहेत याचा अनुभव होतो

संपूर्ण