मेळघाटात सामाजिक अंकेक्षनाच्या जनसुनावणीत बहुतेक अधिकारी,ग्रामसेवक,तांत्रिक,रोजगार,सेवक कार्यवाहीस पात्र!

मेळघाटात सामाजिक अंकेक्षनाच्या जनसुनावणीत मग्रारो हमी योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता

धारणी प्रजामंच,17/10/2017

महाराष्ट्र शासनातर्फे मेळघाटातील धारणी-चिखलदरा तालुक्यात सन 2017 – 18 या आर्थिक वर्षात झालेल्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची सामाजिक अंकेक्षण गेल्या 2 ते 12 ऑक्टोबर पर्यंत करण्यात आले.13 ऑक्टोबर रोजी सर्व ग्रामपंचायतमध्ये जनसुनावणी पार तर 15 ऑक्टोबर रोजी तालुकास्तरावर उर्वरित मुद्दे जनसुनावणीमध्ये घेण्यात आले.
या जणसुनावणी मध्ये उर्वरित मुद्दे निकाली काढण्यासाठी धारणी येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जनसुनावणी घेण्यात आली तर चिखलदरा तालुक्याची चिखलदरा येथेच घेण्यात आली. सदर व जनसुनावणीमध्ये तक्रार करते , काम करणारी यंत्रणा , यांची समोरासमोर साक्ष नोंदवून तक्रार निवारण अधिकारी यांनी अनेक कामांवर ताशेरे ओढून कारवाई करण्याचे संकेत दिले यावेळी तक्रार अधिकारी यांना कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून आल्याने बहुतेक अधिकारी, ग्रामसेवक, तांत्रिक रोजगार सेवक कार्यवाहीस पात्र असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली.ग्राम पंचायत स्तरावर अनेक दस्तावेज अपुऱ्या अवस्थेत तपासणी दरम्यान आढळून आले.
त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या गुंतलेल्या संबंधितांचे धाबे दणाणले आहे.
सामाजिक अंकेक्षण विभागातर्फे होणाऱ्या जनसुनावणीत बहुतेक ग्रामपंचायत विरुद्ध तक्रारी होत्या. यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत निहाय आलेल्या तक्रारींचे निवारण करण्यात आले,यावेळी तक्रार निवारण प्राधिकारी ओंबसतन यांनी अनेक कामावर ताशेरे ओढलेत.तक्रार निवारण प्राधिकारी यांनी सभेमध्ये उपस्थित गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांना विविध विषयांवर तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देशित केले,जनसुनावणीमध्ये रोजगार हमी योजने संदर्भात जॉब कार्ड उपलब्ध करणे , कामाच्या जागेवर प्रथमोपचार पेट्या न ठेवणे , पिण्याची पाण्याची व्यवस्था व्यवस्थित न ठेवण्याबाबत , 3 दिवसात सुधारणा करण्याचे निर्देश दिलेत यापैकी बहुतेक गोष्टी नाहीच्या प्रमाणात आढळल्या,उशिरापर्यंत चालणाऱ्या या जनसुनावणीत ग्रामसेवक रोजगार सेवक तांत्रिक सहायक यांच्याविरुद्ध प्रशासकीय स्वरूपाची कारवाई होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

संपूर्ण