धारणमहू शाळेतील मुख्याध्यापकसह निम्म्याहून अधिक शिक्षक सुटीवर,शालेय प्रशासनाचा तीन तेरा

धारणी प्रजामंच,16/10/2018 

धारणी पंचायत समिती मुख्यालयावरून अवघ्या १० किमी अंतरावरील राजकारणाने वेढलेल्या धारणमहू येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी आळीपाळीने सुटीवर जाण्याचा सपाटा सुरु केला असून नियमाचे उल्लंघन करीत असल्याची धक्कादायक माहिती सूत्राकडून मिळाली असून शालेय प्रशासनाचे पूर्णपणे तीन तेरा उडाल्याचे समोर येतेय मुख्याध्यापक व शिक्षक यांनी शाळेवर दांडी मारण्याचा उपक्रम सुरू केला असून शाळेतील मुख्याध्यापक मागील चार दिवसांपासून शाळेकडे फिरकलेच नाही

धारणमहू जिल्हा परीषद शाळेत 9 नियमित शिक्षक व 3 हंगामी असे एकूण १२ शिक्षक कार्यरत असल्याचे सांगण्यात आले मात्र  दिनांक 15 ऑक्टोबरला मुख्याध्यापक व दोन शिक्षक रजेवर २ प्रशिक्षणाला असल्याची माहिती मिळाली, दिनांक १६ ऑक्टोबरला 4 रजेवर २ प्रशिक्षणाला हंगामी पैकी 1 असे एकूण 7 शिक्षकांनी शाळेला दांडी मारल्याचे माहिती हाती आली,

काही दिवस अगोदर येथील मुख्याध्यापकाने गावातीलच एका स्थानिक राजकारण्याशी हातमिळणी करून खोटी पोलीस तक्रार करण्याचा बहुमान मिळवला तेव्हापासून सुट्टीवर आहेत, मात्र शाळेतील प्रशासनाची दुरवस्था झाल्याचे सांगण्यात येते या शाळेवर आळीपाळीने सुट्टी वर जाणे पाठवा अथवा गैरहजर राहण्याचा प्रकार सतत सुरू आहे मात्र या सर्व प्रकाराला येथील एक राजकारणी व्यक्ती खतपाणी घालत असल्याचे बोलल्या जात आहे, याबाबत काय सत्यता अजुनी समोर आली नसली तरी शाळेची परिस्थिती विदारक असल्याचे बोलल्या जाते, शाळेची दुरवस्था करण्यास जबाबदार कोण? असा प्रश्न आता उभा ठाकला असून मुख्याध्यापकाचे येथील शिक्षकांवर नियंत्रण नसल्याचे समोर येते मात्र वरिष्ठ अधिकारी याकडे कधी लक्ष देतील हा यक्ष प्रश्न आहे यामुळे मुलांचा होणाऱ्या शैक्षणिक नुकसानाची जबाबदार कोणाची ? मुख्याध्यापक अप्रत्यक्षपणे राजकीय मंडळी व इतर संघटनाशी जवळीक साधून आपली अरेरावी चालवत असल्याचे बोलल्या जाते.

संपूर्ण