मेळघाटात भ्रष्ट अधिकारी-कर्मचारीसाठी कलम ३५३ ठरत आहे सुरक्षा कवच ?

धारणी प्रजामंच,17/10/2018

धारणी तालुक्यात होणारी विविध विकास कामे यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे सतत चर्चा कानावर पडते,अश्या परिस्थितीत मेळघाटात भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कलम 353 आधार घेऊन आपला भ्रष्टाचार लपवण्याचा नवीन उपक्रम सुरू केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे, ही बाब मेळघाटातील सामान्य जनतेसाठी अतिशय धोक्याची मानली जात आहे, मेळघाटात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांनी आता कलम 353 दुरुपयोग करण्यास सुरुवात केली असून आता पुन्हा भ्रष्टाचार करण्यास भ्रष्ट अधिकारी-कार्माचारीला रान मोकळे होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा परिस्थितीत मेळघाटचा विकास होणार तरी कसा असा प्रश्न सामान्य जनतेसमोर आता उभा ठाकला आहे,

नुकतेच दिनांक 13 ऑक्टोबर 2018 रोजी ग्रामपंचायत हरदोली येथे आयोजित विशेष ग्रामसभेत लोकांनी मनरेगा मध्ये झालेल्या घोळ उघडीस आणण्याचा प्रयत्न केले असता येथील ग्रामसेवक विवेक श्रीराम राठोड याने धारणी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा  आणल्या प्रकरणी खोटी तक्रार नोंदविण्याचा महाप्रताप केला, कलम 353, 504, 34 गुन्हा दाखल झाला यामुळे  आता सर्वसामान्य जनतेमध्ये भीतीचे वाजता निर्माण झाले आहे, हरदोली ग्रामपंचायतच्या विशेष ग्राम सभेत सहज बोलण्यावरून पोलीस गुन्हा नोंदविल्या जात असेल तर ग्राम सभा का बोलावता असा सवाल उपस्थित होतो, जनतेची फसवणूक करणारे कर्मचारी जनतेची सेवा करणार तरी कसे असा प्रश्न आता चर्चेला जात आहे, अशी तक्रार करणे म्हणजे जनतेच्या मुलभूत अधिकाराचे हनन करणे आहे, ग्रामसेवकाला मनरेगा मध्ये झालेल्या घोटाळ्यावर प्रश्न विचारल्याने त्याचा राग तडपायावरून डोक्यापर्यंत गेलाय, आपला भ्रष्टाचार लापवायचं असेल तर कलम 353 शिवाय उपाय नाही अशा परिस्थितीत हरदोली येथील ग्रामसेवक व सरपंच यांनी संगमत करून कामात अडथळा आणल्याप्रकरणी खोटा गुन्हा दाखल केला आहे,

या खोट्या गुन्हा विरोधात पोहरा व हरदोली येथील शेकडो महिला-पुरुष उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याकडे धडकले आणि खोटे पोलीस गुन्हे दाखल करणाऱ्या भ्रष्ट ग्रामसेवक विवेक श्रीराम राठोड याला  तत्काळ निलंबित करून वरिष्ठांकडे बडतर्फ करण्याची शिफारस करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे, विवेक राठोड या ग्रामसेवकाकडे दोन ग्रामपंचायतीचा प्रभार असून बिजुधावडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या माणसूधावडी येथे एका निष्पाप व्यक्तीला कोणतीही परवानगी न घेता विद्युत खांबवर विद्युत दिवे लावण्यासाठी चढवण्यात आले होते आणि अचानक विज आल्याने खांब वर चढलेल्या इसला विजेचा धक्का लागून जागीच ठार झाला,तरी ही ग्रामसेवक राठोड याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विवेक राठोड हे धारणी पंचायत समितीतील वरिष्ठ अधिकाऱ्याचे(विस्तार अधिकारीचे) अति निकटचे ग्रामसेवक असल्याचे बोलले जाते,तर याविषयी खमंग चर्चा शहरात सुरू असून अजूनही काही ग्रामसेवक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून सामान्य जनतेवर अन्याय अत्याचार करत असल्याचे चर्चा सुरू आहे,

दुसरी घटना धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या धारणमहू येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत शालेय पोषण आहार शिजवणार्‍या विधवा महिलेच्या मुलासोबत घडली, मुलगा आपल्या आईला घराची किल्ली देण्यासाठी शाळेत आले असता आपल्या आईस मुख्याध्यापक शिवीगाळ करीत असल्याचे बघितल्यावर मुलाने माझ्या आईला एवढ्या खालच्या स्तरापर्यंत शिव्या देण्याचे कारण विचारल्यावर  मुख्याध्यापक रामलाल बेठेकर याने त्या मुलाला बेदाम मारहाण केली आणि माझ्या शासकीय कामात अडथळा आणल्याचा खोटा आरोप करत पोलीस स्टेशन गाठले, हास्यास्पद बाब तर ही की संबंधित मुख्याध्यापकाला त्या स्वयंपाक करणारया महिलेने आपल्या शाळेतून मदतनीस तांदूळ करून नेत असल्याचे सांगितल्यावर मुख्याध्यापकाचा राग अनावर झाला व स्वयंपाकीन विधवा महिलेला शिवीगाळ देण्यास सुरुवात केली,ज्या गुरूला समाज आदर्श मानते त्या गुरूने स्वतःचे कपडे स्वतः फाडून मला माझ्या शाळेच्या आवारात महिलेच्या मुलाने मारल्याचा खोटा आरोप करीत होतकरू विद्यार्थ्याच्या भविष्याचा खेळ केला, काही प्रमाणात का होईना पण कोणत्याही शिक्षक संघटनांनी या प्रकरणाच्या खोलवर जाऊन चौकशी न करता आपले शिक्षकांत राजकारण चमकविण्यासाठी चक्क गटविकास अधिकारी यांचे कार्यालय गाठले व संबंधित निरपराध होतकरू विद्यार्थ्यांवर कलम 353 गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, विशेष बाब तर ही की धारणमहू शाळेचे प्रशासन अतिशय ढासळल्याचे सूत्रांकडून माहिती असून याकडे अद्यापही वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नाही हाच मोठा प्रश्न आहे, मागील १८ वर्षांपासून अगदी तोडक्या मानधनावर शालेय पोषण आहार शिजविणार्‍या त्या विधवा महिलेचे रोजगार हिसकावण्यासाठी येथील मुख्याध्यापकाने एका स्थानिक राजकारणी व्यक्तीशी संगमत करून हा सर्व प्रकार घडून आल्याचे बोलले जात आहे, ही राजकीय व्यक्ती या मुख्याध्यापकाला मोहरा म्हणून वापरून त्या स्वयंपाकीण बाईचा छळ करत असल्याचे सूत्राकडून माहिती मिळते आता मेळघाटात कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाकडे लक्ष देण्यापेक्षा आपला भ्रष्टाचार कसा लापवता येईल याकडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते,

संपूर्ण