जि.प.सदस्या पूजा येवले यांच्या सर्कल मधील गांगरखेडा गावात भीषण पाणी टंचाई

चिखलदरा,प्रजामंच12/10/2018

चिखलदरा तालुक्यातील दुर्गम भागात येणाऱ्या गांगरखेडा येथे भीषण पाणी टंचाईशी सध्या सामना करावा लागत आहे अशा परिस्थितीत पुढे उन्हाळ्यात काय परिस्थिती निर्माण होईल याची कल्पना नाही,असे असताना मात्र जिल्हा परिषद सदस्य पूजा येवले यांनी या गावाकडे पाठ फिरवल्याचे आरोप गावकऱ्यांकडून होत आहे.

दोन वर्षे आधी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पूजा येवले यांनी हतरू जिल्हा परिषद सर्कलमधून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून जिंकून आल्या असून गांगरखेडा हे गाव येवले यांच्या जिल्हा परिषद सर्कलच्या हद्दीत येते.पूजा येवले यांना विजयापर्यंत पोहोचवण्यासाठी गांगरखेडा येथील नागरिकांनी मोठे योगदान व भूमिका आहे. असे असतांना या गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे मात्र या पाणीटंचाईकडे जिल्हा परिषदेसह इतर ही मोठ्या पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे ओरड गावकऱ्यांकडून होत आहे, जनताही मूलभूत सुविधांसाठी किती त्रस्त आहे याच्याशी राजैकीय नेत्यांना तिळमात्र ही घेणे नसल्याचे राग गावकरी व्यक्त करत आहे,  गांगरखेडा येथील नागरिक पाणीपुरवठा योजना बंद असल्याने विहिरीतील गढूळ पाणी पिण्यासाठी वापर असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली असून जनतेच्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही,राजकीय मंडळी आपला मतदानापुरता वापर करत असल्याची नाराजी लोकांनी व्यक्त केली यामुळे गांगरखेडा येथील काही स्थानिक पदाधिकारी यांनी गावाला मोठी पाणीपुरवठा योजना मिळावी म्हणून एका अपक्ष आमदाराच्या दरबारी आपल्या गावाची भीषण पाणी टंचाईची गऱ्हाणी मांडून गावाला पाण्याची सुविधा करून द्यावी अशी केविलवाणी मागणी करतांना दिसून आले, या सर्व परिस्थितीमुळे असे लक्षात येते की ज्या लोकांनी याच ग्रामस्थांच्या यांच्या बळावर खुर्ची काबीज केली ते आहे तरी कुठे असा प्रखर सवाल जनतेकडून होताना दिसत आहे जे ही जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य निवडून येतात ते आपल्या स्वार्थी वृत्ती साठीच झटतात अशी नागरिकांकडून ऐकण्यास मिळाले, गांगरखेडा येथील पाणीटंचाई तत्काळ निवारण करण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

संपूर्ण