वाशिम जिल्ह्यातील पिंपळशेंडा जि.प.शाळेची इमारत 59 वर्षे जुनी, विद्यार्थी जीव धोक्यात घालून घेतात शिक्षण, प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष!

वाशिम प्रजा मंच समाधान गोंडाळ 5/10/2018 
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पिंपळ शेंडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची भयानक दुरावस्था असतांना मात्र जिल्हा परिषद पंचायत समिती प्रशासनाने कमालीचे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे, पिंपळशेंडा येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत 1959 मध्ये बांधण्यात आली असून आजच्या घडीला ही इमारत अतिशय जीर्ण व कमालीचे नादुरुस्त झाल्याचे चित्र आहे असे असतांना या शाळेची दुरुस्ती व नूतनीकरण करण्याचे काम संबंधित विभागाने करणे अपेक्षित आहे मात्र अद्यापही तसे करण्यात न आल्याने या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आपला जीव तळहातावर घेऊन ज्ञानार्जन कारावे लागत आहे,याविषयी शाळेच्या मुख्याध्यापकाला विचारणा केली असता आपण या इमारतीची दयनीय अवस्थाची माहिती वरिष्ठांना पत्राव्दारे कळविल्याचे सांगितले.
मालेगाव पंचायत समिती कार्यालयापासून पिंपळशेंडा जिल्हा परिषद शाळेचा अंतर 30 ते 32 किलोमीटर असल्याचे सांगण्यात येते, पिंपळशेंडा येथे जाण्यासाठी रस्ता चांगला नसल्याने अधिकारी या शाळेला भेटी देत नसतील असा अंदाज सामान्य लोकांकडून लावण्यात येतोय, मिळालेल्या माहितीप्रमाणे पिंपळशेंडा येथे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असून एकूण पटसंख्या 38 आहे,यासाठी २ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे, एकूण वर्गखोल्या दोन असून दोन्ही वर्गखोल्या अति जीर्ण व धोकादायक स्थितीत झाल्याने छत खाली पडू नये म्हणून छताला चक्क उभ्या लाकडी काठीचा आधार देण्यात आला आहे, या दयनीय अवस्थेत संगणक,व इतर साहित्य पडून आहे, विद्यार्थ्यांना विद्युत पुरवठाचा धोका होण्याची संभावना नाकारता येत नाही, पावसाळ्यात वरचे छप्पर पूर्णपणे गळत असल्याने  विद्यार्थ्यांना चक्क व्हरांड्यात अध्ययन अध्यापन करण्यासाठी बसवावे लागते,
पिंपळ शेंडा येथे येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थी आपली जीव तळहातावर ठेवून शिक्षण घेत असल्याचे अवस्था असतांना संबंधित विभागाला जाग कधी येईल असा प्रश्न उपस्थित होतो.

भाग -१

संपूर्ण