काटेपूर्णा नदीत बुडून एकाचा मृत्यू,सर्च ऑपरेशन यशस्वी

वाशिम प्रजामंच समाधान गोंडाळ 4/10/2018

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात येणाऱ्या जऊळका रेल्वे येथील काटेपूर्णा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या व्यक्तीचे बुडून मृत्यू झाला असून पोलिसांच्या शोध मोहिमेला यश आले.

3 ऑक्टोंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास आपल्या ट्रक ड्राइवर सोबत काटेपूर्णा नदी पात्रात मृतक भरत अशोक जाधव वय अंदाजे (20) वर्षे राहणार ठाकुर निमगाव ता.शेवगाव जिल्हा अहमदनगर काटेपूर्णा नदीत आंघोळीसाठी उतरला होता.त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो नदीच्या खोल पाण्यात बुडाला व पाण्यात बेपत्ता झाला होता, या नदीपात्रात मोठया प्रमाणात पाणी असल्याने मृतदेह शोधुन काढणे अवघड त्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना मालेगांवचे तहसीलदार वझीरे आणि  जऊळका रेल्वे गावाचे ठाणेदार जाधव यांनी आपत्कालीन शोध पथकाला प्रचारण केले.तात्काळ सर्च ऑपरेश राबविण्यासाठी येण्याचे सांगीतले. रात्री घटनास्थळी पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांनी पोहचुन अंदाज घेतला, ही नदी नागपुर ते पुणे हायवेवर मालेगांव नजीक असुन 45-50 फुट खोल साचलेले पाणी आहे, यामुळे ४ आक्टोबरला सकाळीच पाच वाजता पथकाने शोध मोहीम सुरु केली, पथक प्रमुख दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी ज्ञानेश्वर म्हसाये, राहुल जवके, प्रविण म्हसाये, उमेश बील्लेवार, ऋतीक सदाफळे, गोविंदा ढोके, यांनी ऑपरेशन चालु केले आणी दोन तासाच्या आत मृतदेह शोधुन बाहेर काढले, यावेळी मृतकाचे नातेवाईक व मालेगांवचे तहसीलदार वझीरे,नायब तहसीलदार राठोड, जऊळका (रेल्वे) ठाण्याचे ठाणेदार बि.एस.जाधवर तलाठी राठोड व इतर कर्मचारी हजर होते.

संपूर्ण