शेतकरी बोंडअळीने त्रस्त असतांना आमदार वाढदिवसात मस्त

तेल्हारा प्रजामंच विशाल नांदोकार,5/8/2018 

प्रारंभी पावसाच्या डोळेझाकने शेतकरी सावरत नाही तोच कपाशीवर बोन्डअळीने आक्रमण केल्याने शेतकरी धास्तावला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची व आधाराची गरज असतांना शेतकऱ्यांच्या भरघोस मतांनी विजयी झालेल्या अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाकडे हे आपल्या वाढदिवसानिमित्त हार तुरे स्वीकारण्यातच गुंग असून शेतकरी बोंडअळीने त्रस्त तर आमदार वाढदिवसात मस्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
तालुक्यातील जमीन ही काळी सुपीक व कसदार आहे. तालुक्यात नगद पीक म्हणून कपाशीचा पेरा अधिक प्रमाणात होतो. तेल्हारा तालुक्याकडे विकासाच्या दृष्टीने मागासलेला तालुका या दृष्टीने पहिल्या जाते. शेती चांगली असली तरी त्यातून भरभरून पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाविषयीचे मार्गदर्शनाची गरज आहे. आपल्या भगत नवीन औद्योगिक प्रकल्प येतील व शेतीमालाला बाजारपेठ निर्माण होऊन आपले चांगले दिवस येतील  या आशेपोटी या भागातील शेतकऱ्यांनी आमदार भारसाकडे यांच्या झोळीत भरभरून मते टाकली होती. परंतु शेतकऱ्यांची ही आशा भाबळी ठरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तालुक्यात कपाशीवर बोंडअळीने तर सोयाबीनवर उंटअळीने चौफेर हल्ला चढविला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी पूर्णतः धास्तावला आहे. संकटात असणाऱ्या शेतकऱ्याला आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या कडून आपल्या भागात भेटी देऊन शेतीची पाहणी करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून होत असतांना मात्र आमदार आपल्या वाढदिवशी भरभरून  कार्यक्रम घेण्यात मग्न होवून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याची जोरदार चर्चा शहरासह तालुक्यात सुरू होती.
जिल्ह्यात भाजपचे पायामुळ रोवणारे ज्येष्ठ नेते स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या मृत्यू नंतर वापढदिवस साजरा न करण्याचे आमदार प्रकाश भारसाकडे यांनी आवाहन केले होते, मात्र ते विसरून आपल्या निवस्थानी वाढ दिवसाच्या कार्यक्रम आयोजित करून आश्वासनापासून युटर्न घेतल्याने तेल्हारा तालुका  कुणबी युवक संघटनेचे                   संदीप खारोडे यांनी नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांच्या समस्या अग्रस्थानी असाव्यात अशी अपेक्षा केली.

संपूर्ण