मराठा आंदोलनातही फुलले कमळ,राज्‍यातील २७  पैकी १६ महापालिकेंवर भाजपचा कब्जा

मुंबई,प्रजामंच,3/8/2018

सांगली-मीरज व जळगाव महापालिकांवर मराठा आंदोलन राज्यात पेटले असतांना भाजपने विजय मिळवीत राज्‍यातील एकूण 16 महानगरपालिकांवर कमळ फुलवले आहे. राज्‍यात एकूण 27 महापालिका आहेत. राज्‍यभरात सुरू असलेल्‍या मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाचा जळगाव व सांगली-मीरज महापालिका निवडणूकांवर कोणताच परिणाम झाला नसल्‍याचेही यानिमित्‍ताने समोर आले आहे. निवडणुकांसाठी स्‍थानिक पातळ्यांवर भाजपने उभे केलेले उमेदवार, प्रचारातील मुद्दे यांनीच या निवडणुकांत महत्‍त्‍वपूर्ण भूमिका बजावल्‍याचे मत तज्ञांनी व्‍यक्‍त केले आहे.

भाजपच्या ताब्यातील  महापालिका
१. पनवेल, २. पिंपरी चिंचवड, ३. पुणे, ४. मीरा-भाईंदर, ५.सांगली-मीरज, ६. जळगाव, ७. नाशिक, ८. नागपूर ९.लातूर, १० सोलापूर, ११, अकोला, १२. अमरावती, १३. उल्हासनगर, १४. धुळे, १५. चंद्रपूर आणि १६. कोल्हापूर

शिवसेना
१. मुंबई, २. ठाणे, ३. कल्याण-डोंबिवली, ४. औरंगाबाद, ५. अहमदनगर

 काँग्रेस
१. भिवंडी, २. नांदेड, ३. मालेगाव, ४. परभणी

राष्ट्रवादी
१. नवी मुंबई

अपक्ष (वसई विकास आघाडी)
वसई-विरार

संपूर्ण