अकोला जिल्ह्यातील दहीहंडा पोलिसांनी गोमांस वाहून नेणारी टाटा सुमो केली जप्त

दहीहंडा प्रजामंच विशाल नांदोकार
काही वेळा पूर्वी दहीहंडा पोलिसांनी मोठी कार्यावाही केल्याचे वृत्त हाती आले असुन MH-20/Y 9878 क्रमांकाची टाटा सुमो या चारचाकी वाहनातून जवळपास दोन क्विंटल गोमांस भरलेले आढळले असता, पोलिसांनी या वाहनाला ताब्यात घेतले असुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.सदर कारवाई दहीहंडा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक राजेश जोशी यांनी केली.
यामध्ये जवळपास दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती आहे . पुढील कारवाई दहीहंडा पोलीस करीत आहेत.

संपूर्ण