तेल्हारा शहरातील अंतर्गत रस्त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे त्वरित बुजवा अन्यथा आंदोलन-भाजप सरकारला भाजयुमोचा ईशारा

तेल्हारा प्रजामंच विशाल नांदोकार १७/७/२०१८

अंतर्गत रस्त्यावर पडलेले खड्डे तसेच शहरातील मध्यभागातून वाहणाऱ्या गौतमा नदीवरील पुलांवर जीवघेणे खड्डे निर्माण झाले. ते त्वरित बुजवण्यात यावे यासाठी मुख्याधिकारी न प तेल्हारा यांना बेशरम चे झाड देऊन सदर समस्या बाबतचे निवेदन देऊन भाजयुमो तर्फे ईशारा देण्यात आला.
तेल्हारा शहरातील अंतर्गत रस्त्यावर खड्डे निर्माण झाल्याने अनेक छोटे मोठे अपघात घडत असून याबाबत वारंवार जनतेकडून हे खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी होत आहे.परतु नगर परिषद प्रशासन जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असून त्वरित शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्डे त्वरित बुजवण्यात यावे नाहीतर भाजयुमो तेल्हारा तर्फे आंदोलन छेडण्यात येईल.असा इशारा यावेळी मुख्याधिकारी यांना निवेदनातून देण्यात आला.

यावेळी भाजयुमो ता.अध्यक्ष सतिष जयस्वाल, जिल्हा सरचिटनिस लखन राजनकर, शहर अध्यक्ष अक्षय पदवाड, विशाल भुजबले, राजेश काटे, सागर नेरकर, गणेश रत्नपारखी, राहुल झापर्डे, गणेश ईगोले, भुषन सोळंके, सागर सुगंधी, सैरभ पाथ्रीरकर यांच्या सह अनेक भाजयुमो चे कार्यकर्ते उपस्थित होते.

संपूर्ण