शाळेच्या मध्यान्ह भोजनातून १४१ विद्यार्थ्यांना विषबाधा

लातूर, प्रजामंच,4/7/2018

लातूर जिल्हयात येणाऱ्या जळकोट तालुक्यातील मंगरुळच्या  जिल्हा परिषद  शाळेतील १४१ विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून  विषबाधा झाल्‍याची बातमी आहे, वाढवणाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात विद्यार्थ्यावर उपचार करुन सुट्टी देण्यात आल्याची माहिती आहे,.

मंगरुळ येथे १ ली ते ७ वी पर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे. विद्यार्थ्यांना दुपारी मध्यान्ह भोजन दिले गेले जेवन झाल्यानंतर सहा विद्यार्थ्यांना मळमळ होऊन उलटल्या झाल्या. त्यानंतर तेथील सर्वच विद्यार्थ्यांना मळमळ व डोकेदुखी सुरू झाली. यामुळे शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी त्यांना तातडीने तेथून जवळ असलेल्या वाढवणा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. खाटांची संख्या कमी असल्याने त्यांना संतरंज्या अंथरण्यात आल्या. विद्यार्थी संख्या अधिक असल्याने अन्य प्राथमिक केंद्रांच्या डॉक्टरांनाही बोलावण्यात आले.

उपचारानंतर काही काळ त्यांना केंद्रात ठेवून नंतर सुट्टी देण्यात आली. विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी गावकऱ्यांनी  प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठी गर्दी केली होती. विषबाधेचे नेमके कारण समजू शकले नाही परंतु, ती पिण्याच्या  पाण्यातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

संपूर्ण