सामाजिक संस्थांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पाठबळ द्यावे – प्रा.विश्वनाथ गायकवाड 

सांगली प्रजामंच भूषण महाजन

बालाजी सार्वजनिक वाचनालय कडेगांव यांच्या वतिने तालुक्यातील इ.१० वी व इ १२वी तसेत महाराष्ट्र लोकसेवा अयोगाच्या वतिने घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदासाठीच्या परिक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापिका सौ.एन.ए.मुल्ला मँडम होत्या.

समाजात आज सर्व क्षेञात मुली आघाडीवर आहेत.तरीही महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आजही ऐरणीवर आहे.महिलांच्या संरक्षणासाठी व त्याना समाजात मानाचे स्थान निर्माण करुन देण्यासाठी समाजाने व आशा सामाजिक संघटनानी पुढाकार घेणे गरजेचे आहे.महिला सक्षम आहेत.त्या आपल्या गुणवत्तेने आपले स्थान निर्माण करतील पण समाज म्हणुन आपण त्याच्या पाठीमागे खंबिरपणे उभे राहुन त्याना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.आपल्या पुरोगामी विचारवंताच्या देशात महिला सुरक्षित नाहीत ही खेदाची गोष्ट आहे.समाजाने जागृत राहुन.महिलांचा आदर व त्यांना सन्मानाची वागणूक देणे गरजेचे आहे.समाजातील गुणवंत व होतकरु विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम हे बालाजी सार्वजनिक वाचनालय करित आहे ही गोष्ट कैतुकास्पद अभिनंदनिय आहे.समाजातील सर्व घटकांनी याचे अनुकरण करुन गुणवंताना प्रोत्साहन द्यावे. असे मत गायकवाड यांनी पुढे बोलताना व्यक्त केले .

प्रारंभी वाचनालयाचे अध्यक्ष संपतराव पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक व स्वागत केले.प्रविण पवार यांनी इतिवृत्ताचे वाचन केले.दरम्यान तालुक्यातील १० वी, व १२ वी तील केद्रनिहाय प्रथम येणाऱ्या व कडेगांव तालुक्यातील पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या ९ गुणवंत विद्यार्थी यांचे सत्कार मान्यवरांच्या हास्ते करण्यात  आले.तसेच वह्याचे वाटप करण्यात आले.

स्पर्धा परिक्षा म्हणजे मृगजळ आम्ही तरुण आपले नशिब आजमवण्याचा प्रयत्न करीत असतो.जिद्द चिकाटी आमच्यात असते.पण आम्हांला आमचा आत्मविश्वास टिकविण्यासाठी समाजाने स्पर्धा परिक्षांचा आभ्यास करणाऱ्या विद्यार्थी यांच्या मागे खंबिरपणे उभा राहुन त्यांना प्रोत्साहन द्यावे.एक दोन वेळेस अपयश आले म्हणुन त्यांना हिनवू नये.त्यामुळे त्याचे खच्चीकरण जिद्द असुन अनेकदा अनेक विद्यार्थी समाजातील अपप्रवृत्तीच्या लोकांमुळे आपला अभ्यास सोडून इतर मार्गाचा अवलंब करतात.स्पर्धा परिक्षेत संपादन करण्यासाठी थोडा वेळ लागतो.माञ जिद्द आणि चिकाटी असेल तर यश नक्कीच मिळते.म्हणून समाजाने सुध्दा

या विद्यार्थ्यांना पाठबळ दिले पाहीजे तरच आपल्या ग्रामिण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर यश संपादीत करु शकतील.मी वारणानगरला क्लासला होतो.अनेक परिक्षा दिल्या मुलाखती पर्यंत जायचो.पण मुलाखतीत गुण न मिळाल्याने पुन्हा परत यायचो. नंतर गावी आलो कडेगांव येथे स्वामी विवेकानंद स्पर्धा परिक्षा ग्रंथालय व अभ्यासिकेत प्रवेश घेतला व पुन्हा तयारीला लागलो.अभ्यासिकेचे वातावरण शांत व प्रसन्न असल्यामुळे मला त्याचा फायदा झाला.संयोजकांनी माझा सत्कार केला मी त्याचा आभारी आहे.असे मत पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या संदिप वञे(देशमुख) यांनी व्यक्त केले.

सुप्रिया गायकवाड (विटा) मनिषा महाडीक नेवरी,स्नेहल तांबडे कडेगांव ,मोहसिन मुल्ला नेवरी, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

अंधकवी चंद्रकांत देशमुखे,जगन्नाथ नायकवडी,ज्ञानेश्वर शिंदे,प्रविण पवार,संदिप पवार,प्रमोद माळी,सदानंद माळी,किशोर देसाई,मन्सूर जमादार उपस्थित होते.कार्यक्रमाचे स्वागत संपतराव पवार यांनी केले तर अशोक पवार यांनी अभार मानले.