नागपुर आमदार निवासात स्वयी सहाय्यकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

नागपूर प्रजामंच, ३/७/२०१८

आज सकाळी नागपूर येथिल आमदार निवासात खाजगी सहाय्यक विनोद अग्रवाल यांचा मृतदेह आढळला आहे. त्यांचे हृदय विकाराचे झटक्याने निधन झाल्याचे सांगण्यात येते.शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या नावावर असलेल्या रुममध्ये ते मृतावस्थेत सापडले.

नागपूर येथिल आमदार निवासात असलेल्या रुममध्ये विनोद अग्रवाल (वय ५० वर्षे) हे मृतावस्थेत आढळले. आमदार निवासाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या विंग मधील ४६ क्रमांकाच्या रुम मध्ये विनोद अग्रवाल यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी या पूर्वी आ. ज्योती कलानी यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले होते.मुळ अकोट येथील विनोद अगरवाल यांचे आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास हृदयविकाराचे झटक्याने निधन झाल्याचे सांगण्यात येते.ही खोली आ. रमेश लटके यांच्या नावाने नोंदविली आहे. अग्रवाल हे आ. लटके यांच्या खोलीत झोपले होते.विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनच्या एक दिवस आधी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

संपूर्ण