महामार्गावरील अतिक्रमणाने घेतला युवकाचा बळी मा.मत्री सुभाष ठाकरे यांचा रास्ता रोको  

वाशिम प्रजामंच समाधान गोंडाळ,29/6/2018

वाशिम जिल्ह्यातील शेलुबाजार येथीलल बसस्टॅन्ड चौकातुन गेलेल्या नागपुर-औरंगाबाद या महामार्गाला अतिक्रमधारकांनी मोठ्या प्रमाणात विळखा घातल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे.यामुळे गुरुवारी 28 जून रोजी सध्यांकाळी ७.३० वाजता दरम्यान तपोवन येथील अजय सुनिल येवले(28) हा युवक आपल्या दुचाकीला अपघात झाल्याने मृत्यू झाला,

अजय काही कामानिमित्त शेलुबाजार येथे आला होता.आपली कामे उरखुन सांयकाळी सात वाजता आपल्या गांवी जाण्या करिता शेलुबाजार बसस्टॅन्ड चौकातुन गेलेला नागपुर औरंगाबाद हा महामार्ग ओलांडत असतांना औरंगाबाद कडुन नागपुरकडे जात असलेल्या MH 04 AB 5722 या क्रमांकाच्या आयशर ट्रकच्या चाकाखाली आला यामध्ये सुनिल येवले जागीच ठार झाला.मात्र सुनिलच्या मृत्यूचे कारण महा मार्गावरील चौकात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अतिक्रमणामूळे झाले असून पोलिसांच्या दूर्लक्ष पणामुळेच झाला असा जनतेकडून आरोप केल्या जात आहे,

गुरुवारी शेलूबाजार चौकात आयशर ट्रकाने २७ वर्षीय युवकाला चिरडले त्या निषेधार्थ आज शुक्रवारी २९ जून रोजी माजी मंत्री सुभाष ठाकरे यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांनी शेलुबाजार बसस्टॅन्ड चौकातील अतिक्रमण त्वरित हटविन्यासाठी नागपुर औरंगाबाद महामामार्गावर एक तास रास्ता रोको केला.यामुळे नागपुर औंरंगाबाद अकोला व मंगरुळपिर या मार्गावरील मोठया प्रमाणात वाहतुक ठप्प होऊन ३किमी ते ४ कि. मी. अंतरापर्यंत लांब लांब रांगा लागल्या.रास्ता रोको मुळे पूर्णपणे वाहतूक थांबली.चौकातील अतिक्रमण तात्काळ हटविण्याचे आश्वासन पोलिस विभागाकडुन आंदोलन कर्त्यांना देण्यात आले.आश्वासनानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आले.

संपूर्ण