खाजगी आरामदायी ट्रॅव्हलचा अपघात ३ गंभीर जखमी

वाशिम,प्रजामंच,समाधान गोंडाळ27/6/2018

किन्हीराजा येथे नागपूर- औरंगाबाद साठी धावणाऱ्या हमसफर या आरामदायी ट्रॅव्हलचा अपघात झाला, या अपघातात ३ प्रवाशी गंभीर जखमी झाले असून १६ प्रवाशी किंचित बचावले, ही घटना आज बुधवारी २ वाजता दरम्यान किन्ही हॉटेलजवळ घडली,

नागपूरवरून MH20/DD 808  या क्रमांकांची लक्झरी बस भरधाव वेगाने औरंगाबाद कडे जात होती, विरुद्ध दिशेने येणारया CG07/BA-6414 क्रमांकाच्या कांदा भरलेल्या ट्रकने धडक दिल्याने लक्झरी बसच्या समोरील भागाचा मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे, हमसफर लक्झरी बसचे चालक गझन खान, व सुभाष इंगोले तर क्लीनर राजा असे तीन जण गंभीर जखमी झाले आहे, ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून लक्झरीच्या चालकाने जऊळका रेल्वे पोलीस स्टेशनला सदर घटनेची तक्रार दिली आहे, फरार ट्रक चालका विरूद्ध गुन्हा नोंदविण्यात असून फरार चालकाचा पोलीस शोध घेत आहे.

संपूर्ण