खरेदी -विक्री संस्थेचे अध्यक्षा सह ७ संचालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल; २५जून पर्यंत पोलीस कोठडी

अचलपुर प्रजामंच,अशोक वस्तानी
अचलपुर बाजार समितित तुर खरेदीत टोकणपद्धतीत मनमानि करुन घोटाळा केल्याचे तक्रारी वरुन अचलपुर पोलीस ठाण्यात खरेदी -विक्री संस्थेचे घोटाळेबाज अध्यक्षासह सात संचालकाविरुद्ध कलम३०९:३४नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली व फरार अारोपीचा शोध थानेदार अाधारसिंग सोनोने करित अाहे.अटक आरोपीमध्ये अध्यक्ष प्रकाश पवित्रकार(६७,)प्रमोद उत्तम लांडे(४२); अरविंद माणिक हरने(५७);अशोक दौलत मालखेडे(५३)रमेश शंकर मडघे(६९);अनिल अजाबराव पवार(४७);व मुकुन्दाबाबुराव उभाड(४५) यांचा समावेश अाहे न्यायालयात हजर केल्यानंतर २५जुन पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तुर खरेदी वेळी शेतकऱ्यांची गर्दी बघून टोकन पद्धतीचा वापर करन्यात अाले होते,मात्र ऑनलाइन नोंदणीत अनियमितता दिसुन आल्याने रयत संघटनेचे राहुल कडु यांनी जिल्हाधिकारी कडे रीतसर तक्रार करुन उपोषण केले होते याची दखल जिल्हाधिकारी यांनी घेतली व तहसीलदाराला चौकशीचे आदेश दिले. तहसिलदार यांना चौकशी दरम्यान राहुल कडुंच्या तक्रारित तथ्य असल्याचे अाढळले आणि तसा अहवाल जिल्हाधिकारी यांच्या कडे अहवाल सादर करण्यात आले होते,जिल्हाधिकारी यांनी तहसिलदार जेेन यांना फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्यानुसार रितसर अचलपुर पोलिस ठाण्यात तशी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सदर कार्यवाही केली.या घटनेमुळे सहकार श्रेत्रात एकच खळ्बळ उडाली आहे, शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी बांगर;रयत प्रमुख राहुल कडु व तहसिलदार जेेन यांचे शतश:अाभकर मानले.

संपूर्ण