तेल्हारा पोलिसांची   गोमांस विक्रेर्त्यांवर कारवाई ,एका आरोपीसह गोमांस,दुचाकी जप्त

तेल्हारा प्रजामंच,विशाल नांदोकार१८/६/२०१८ 

तेल्हारा पोलिसांनी तालुक्यातील गोमांस विक्रेत्यांविरुद्ध धरपकड सुरू केली असून कारवाईचा सपाटा लावला आहे.रविवारी  सकाळी गोमांस घेऊन जाणाऱ्याला रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली.गेल्या काही महिन्यांपासून गोमांसाची अवैध मार्गाने विक्री करणाऱ्या  विरुद्ध धरपकड सुरू केली असून एकाच आठवड्यात ही दुसरी कारवाई केल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोमांस विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे सिद्ध होते.लगतच्या पोलीस स्टेशन हद्दीतील गावामध्ये गोवंशाची कत्तल करून तालुका भर गोमांस विक्रीचा व्यवसाय सुरू असून तेल्हारा पोलिसांनी मात्र अवैध रित्या गोमांस विक्री करणाऱ्या विरुद्ध मोहीम उघडली असून रविवारी सकाळी पाथर्डी फाट्यावर गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला असता अडगाव (मोठे)येथील आरोपी शेख इमाम शेख नबी (५०) याला एम एच २८ एफ १३२० या दुचाकीवरून गोमांस घेऊन जाताना रंगेहाथ पकडले.चॉकशी केली असता गोमांस अंदाजे १२ किलो किंमत ६८० रु व दुचाकी किंमत १० हजार असा ऐकून १०६८० रु चा मुद्देमाल सह आरोपीला अटक करण्यात आली.कलम ४२९ भांदवी सहकलम ५,५(क),९,९(अ) प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ व सुधारित गोवंश हत्या प्रतिबंध कायदा २०१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.सदर कारवाई ठाणेदार सचिद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पि एस आय हर्षल चाफले,पो.कॉ. गजानन राठोड,अनंत मुळे, भरतसिंग ठाकूर,वासुदेव ठोसरे यांनी केली.

संपूर्ण