तिन मजली कापड शो रुमला आग ! कोट्यावधीचे नुकसान

वाशीम प्रजामंच समाधान गोंडाळ१४/६/२०१८

वाशिम जिल्हामध्ये येत असलेल्या मंगरुळपिर येथिल गोपाल ड्रेसेस च्या तिन मजली ईमारत असलेल्या शोरुमला 12 जून रोजीच्या मध्यराञी अचानक आग लागली ही आग एवढी भंयकर होती की या आगीचे लोळ संपुर्ण मंगरुळपिर शरात दिसुन येत होते. या आगीवर नियञंण मिळविन्या करिता मंगरुळपिरसह वाशिम, कारंजा येथिल अग्निशमन दलाला पाचारण करन्यात आले होते.हि आग आटोक्यात येइपर्यंत या शोरुम मधिल कापडासह सर्वच वस्तुची राख रांगोळी झाली होती.
शोरुम मालक राञी बारा वाजता शोरुम बंद करुण घरी गेल्यावर हिआग लागली त्यामुळे कुठली जिवितहाणी झाली नसली तरी याआगीमध्ये गोपाल ड्रेसेसच्या शोरुम मालकाचे एक ते दिड कोटी रुपयापेक्षा ज्यास्त नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. तसेच हिआग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पस्ट झाले नसले तरी हिआग शाॅट सर्कीट मुळे आगली असल्याचे सांगन्यात येत आहे.वृत्त लीहेपर्यंत नुसनाची माहीती गोळा करन्याचे काम चालु होते.

संपूर्ण