पाण्याच्या शोधात अस्वलाची नागरिवस्तीकडे धाव, किन्हिराजा येथे गावकर्‍यामध्ये दहशत

वाशीम, प्रजामंच समाधान गोंडाळ,5/4/18

जंगलातील पाण्याचे स्त्रोत पुर्णपणे आटले आहे, त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात नागरीवस्तीकडे धाव घेत असल्याच्या घटना सतत घडत आहे, असेच एक अस्वल पाण्याच्या शोधात भटकंती करीत असतांना किन्हिराजा येथील बसस्टॅड जवळ 4 जुन रोजी दुपारी 4-30 वाजता दिसुन आले असता बसस्टॅडवरिल व गावातील शेकडो नागरीक त्याला पाहण्याकरिता जमले, लोकांची गर्दी बघून अस्वल सैरावैरा धावत होते.अखेर ते अस्वल जंगल्याच्या दिशेने पळून गेले परंतु त्याची दहशत गावकर्‍यामध्ये अद्याप ही कायम आहे.

किन्हिराजा परिसरात खुप मोठ्या प्रमाणात जंगल असुन गावाच्या ३ किलो मीटर अंतरावर काटेपुर्णा अभयारण्य आहे त्यामुळे या परिसरातिल नागरिंकाना अनेक वेळा बिबट्यासह ईतर अनेक लहान मोठ्या जंगली प्राण्याचे व पशुपक्षाचे दर्शन होते.परंतु आज पंर्यंत अस्वल कोणालाच दिसले नाही आज 4जून रोजी प्रथमच अस्वल दिसुन आले आणी तेही अगदी गावाजवळ त्यामुळे त्याला जवळुन पाहण्याच्या उच्छुकतेपोटी शेकडो नागरिकांनी एकच गर्दी करत त्याचा पाठलाग केला, मात्र अस्वलीने जंगल्याच्या दिशेने पळ काढला

या घटनेची माहीती वन विभागाला देण्यात आली असुन स्थानिक वन कर्मचार्‍यासह वन विभागाची चमु घटनास्थळी पोहचली.

संपूर्ण