धोंड्याकरिता सासुरवाडीला येत असलेल्या जावयाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यु.

वाशिम, प्रजामंच,29/5/2018

किन्हिराजा येथील रहिवासी रामेश्वर खोलगडे यांच्या मुलीचा विवाह मलकापुर जिल्हा बुलढाणा येथिल रहिवासी असलेले अमोल पातुरकर यांच्याशी दोन वर्षापुर्वी झाला होता. खोलगडे यांची मुलगी काही दिवसापुर्वी आपल्या माहेरी किन्हिराजा येथे आली होती. धोंड्याचा महिना असल्यामुळे धोंडे खान्याकरिता व त्या नंतर आपल्या पत्नीला व मुलाबाळाला आपल्या गांवी मलकापुर येथे घेवुन जान्या करिता अमोल पातुरकर मलकापुर वरुण किन्हिराजा येथे 28 मे रोजी येत असतानां त्यांन्या शेलुबाजार येथे येन्यास विलंब झाला राञी 7 वाजे नंतर या मार्गावर किन्हाराजा येथे येण्यास वाहनाची सुविधा नसल्यामुळे अमोल हे शेलुबाजार वरूण पायदळ येत असतांना शेलुबाजार ते किन्हिराजा दरम्यान असलेल्या सोनाळा फाट्या जवळील वळणाच्या मार्गावर अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली या मध्ये ते गंभिर जखमी झालेअसुन त्यांचे पाय निकामी होवुन ते बाजुच्या दहा ते पंधरा फुट खोल असलेल्या खदानीमध्ये जावुन पडले त्याच अवस्थेत ते राञभर या मार्गावरुण ये जा करनारांना आवाज देण्याचा प्रर्यत्न करत होते परंतु त्यांचेकडे कोणीच लक्ष दिले नाही.सकाळी सहा वाजता किन्हिराजा येथिल शिवा शेटे हा युवक आपला अंटोरिक्षा घेउन शेलुबाजार येथे जात असतांना त्याला जखमी अवस्थेतिल अमोल यांचा ओरडन्याचा आवाज आल्यामुळे शिवा याने आपल्यातील माणुसकीचा परिचय देत त्या गंभिर जखमिच्या मदतिला धावून गेला त्याला पाणी पाजले त्याची विचारपुस करुण माहीती मिळवली त्यानंतर अमोलच्या सासर्‍याशी संर्पक साधला त्यांना घटनेची माहीती देउन 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेशी संर्पक साधला परंतु संर्पकाच्या एक ते दिड तास उशिरा रूग्णवाहिका घटणास्थळी पोहचली व गंभिर रूग्णाला वाशिम येधिल जिल्हा ग्रामिण रूग्णालयात घेउन गेली असता त्यांचा मृत्यु झाला.
शेलुबाजार व घटनास्थळाचे अंतर हे केवळ 5 कि.मीटर अतंर असतांना रुग्णवाहीका तब्बल एक ते दिड तास उशिरा पोहचली असल्यामुळे अमोलचा मृत्यु झाला कदाचीत हि रूग्णवाहिका वेळेवर पोहचली असती तर अमोलचे प्राण वाचले असते अशी चर्चा जनसामान्यात आहे.याचबरोबर शिवा शेटे या युवकाने दिलेल्या माणुसकीच्या परिचयाचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.
अमोल याचा मृतदेह ऊत्तरिय तपासणी करिता वाशिम येथेच असुन वृत्त लिहेपर्यंत पोलिसात तक्रार दाखल करन्यात आली नव्हती

 

किन्हिराजा येथिल घटना.मृतक मलकापुर येथिल रहिवासी.

संपूर्ण