पाण्याचा शोधात भटकंती करणारी हरीण नालीत पडली शेतकऱ्याने दिले जीवदान

वाशिम प्रजामंच समाधान गोंडाळ,22/5/2018

तहानलेली हरीण पाण्याच्या शोधात भटकत येवून शेतात असलेल्या नालीत पडल्याने गंभिर जखमी झाले होते, मात्र शेतकऱ्याला ही बाब लक्षात येताच हरिणाच्या मदतीला गेले आणि त्या हरिणीला जीवनदान मिळाले.
कारंजा तालुक्यातील ही दुसरी घटना असून झोडगा येथे आठ दिवसा आधी २ काळवीट पाण्याच्या शोधात विहिरीत पडल्या होत्या, त्यामध्ये एकीचा मृत्यू झाला होता, असे असतांना वन वन विभागाला का जाग येत नाही असा सवाल वन्य प्राणी प्रेमी करत आहे,

नालीत पडलेल्या हरिणीच्या पायला दुखापत झाल्याने उठणे होत नव्हते, तेव्हा गजानन पखाले व प्रमोद पवार यांनी प्राथमिक उपचार करून ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आणून दिली त्यानंतर संजय खेडेकर,प्रवीण बेल्खेडे, अक्षय लोखंडे,सिद्धार्थ पवार, हे मदतीला आले आणि हरिणीला कारंजा येथील पशु रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, ही माहिती वन विभागाला कळवीत हरीणला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले,
कारंजा ते मानोरा या मार्गावर कारंजा येथे हरीण अभयरण्य आहे. या अभयारण्यात पुरेसे अन्न व पाणी उपलब्ध नसल्यामुळे हरीण, व ईतर पशु, पक्षी अन्न व पाण्याच्या शोधात भटकंती करत असल्याचे दिसते, हि भटकंती वन्य प्राण्यांच्या जीवावर बेतत आहे. वन विभागाच्या दुर्लक्षित पणामुळे अनेक पशु पक्षीचे  शिकार सुध्दा केल्या जात असल्याचे बोलल्या आहे.

संपूर्ण