५५ वर्षीय इसमाचा उष्माघाताने मृत्यू

वाशिम, प्रजामंच, समाधान गोंडाळ,21/5/2018 

मंगरूळपीर तालुक्यातील गिंभा येथील ५५ वर्षीय इसमाची उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना २१ मे ला सकाळी ११ वाजता उघडीस आली.

प्राप्त माहितीनुसार, मंगरूळपीर तालुक्यातील गिंभा येथील रहवासी असलेले अरुण नारायण बिहाडे वय ५५ वर्षे हे चार दिवसापासून घरी आले नव्हते, दरम्यान २१ मे रोजी जामणी शेतशिवारात निंबाच्या झाडाखाली मृतावस्थेत इंझोरी येथील शेतकऱ्याला दिसले, इंझोरीपासून ४ किमी.अंतरावर कोठेही पाणी नाही,मृत अरुण पाण्याचा शोधात आला असावा असा अंदाज लावण्यात येत आहे, सध्या ४२ ते ४३ सेल्सींअंश तापमान आणि पिण्याला पाणी न मिळणे यामुळे अरुणला जीव गमावाले लागले उष्माघाताने हा बळी घेतल्याची चर्चा आहे बातमी लिहिस्तोवर सदर घटनेची नोंद पोलिसांत झाली नसल्याचे समजले, सध्या चर्चा काही होत असली तरी पोलीस तपास व शवविच्छेदन नंतरच मृत्यूचे खरे कारण सांगता येईल

संपूर्ण