मंगरूळपीर येथे ८७ लाख किंमतीचा प्रतिबंधित गुटका मुद्देमालसह जप्त

वाशिम,प्रजामंच समाधान गोंडाळ 20/5/2018 

वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथे पोलीस विभागाच्या सतर्कतेमुळे तब्बल ८७ लाख किंमतीचा प्रतिबंधित गुटका मुद्देमालसह जप्त केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून मोक्षदा पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध धंदा विरोधात मोहीम अविरत सुरु असल्याने अवैध धंदा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

गोपनीय सूत्राकडून जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील  यांना २० मे रोजी कारंजा –मंगरूळपीर रोडवरून एम.एच २५ यु १०५८ क्रमांकाच्या ट्रकमधून शासन प्रतिबंधित गुटका वाहून नेल्या जात असल्याची माहिती मिळाली, लगेच अधीक्षक पाटील यांनी मंगरूळपीर उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांना कार्यवाहीचे आदेश दिले,

उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांनी नाकेबंदी करून कार्यवाही केली असता अवैध गुटका भरलेला ट्रक मंगरूळपीर शहराबाहेर वाशिम रोडवर बेवारस अवस्थेत आढळला, ट्रक ताब्यात घेवून कलम १०२ सीआरपीसी नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पंचासमक्ष पंचनामा केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले सुगंधित तंबाखू व सुगंधित सुपारीचे मिश्रण असलेले पुड्यांचे २०० बारदाणे ७२,लाखाचा गुटका व १५ लाखाचा ट्रक असा एकूण ८७ लाखाचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेण्यात आला.पुढील कार्यवाही साठी अकोला सहा आयुक्त अन्न व औषधे प्रशासन विभाग यांना कळविण्यात आले आहे.

ही कार्यवाही मंगरूळपीर ठाण्याचे पो.नि. जायभाये, सहा पो.नि.वाळवे,पोउपनि इंगळे वाशिम स्थानिक गुन्हा शाखाचे पोहेकॉ.संजय शिंदे,ब.न.६४०,पोकॉ.अनंता डौलसे,ब.न.१४६८, पोकॉ. राधेश्याम महल्ले, पोकॉ.सुशील वाकोडेब.न.८५०, पो.ना.प्रेम राठोड,ब.न.१०२५ पो शी. बालाजी बर्वे ब.न.४३३ हे कार्यवाही करतांना सहभागी होते.

संपूर्ण