कायदा जिंकला

देशात आज ज्याला संविधानातील ब्र ही समजत नाही अशी काही मंडळी संविधानावर प्रश्नचिन्ह निर्माण करतांना दिसतात,कमी ज्ञान विषासारखे असते, असं म्हणतात.खरया अर्थाने ७० वर्षात घरोघरी संविधान पोहोचणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही, अनेक गोष्टीच्या प्रबोधनावर शासनस्तरावरून अब्जो रुपये उधळले,पण संविधान प्रचार व प्रसारासाठी असं का करण्यात आले नाही हे काळात नाही मात्र एवढे निश्चित वाटते की, यामागे स्वार्थ शकतो, प्रत्येक भारतीयाला संविधानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे पण तसे दिसत नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा देशाच्या स्वाधीन संविधान दिले तेव्हा सांगितले की, संविधान किती चांगले असले पण ते संविधान अंमलबजावणी करणारा योग्य नसेल तर ते वाईट ही ठरू शकते,त्याप्रमाणे अंमलबजावणी करणारा चांगला असेल तर ते संविधान उत्कृष्ट ठरू शकते असे विधान केले होते ते काही चुकीचे नाही, कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन महत्वाचा असतो, विचार करण्याची विवेक बुद्धीमत्ता ठेवून सकारात्मक भूमिका अंमलबजावणी करणारयाची असणे महत्वाचे आहे.

मेळघाटच्या इतिहासात एक नवा इतिहास जोडला गेला तो म्हणजे एका माजी आमदाराला पोलीस प्रशासनासमोर शरणागती पत्कारण्याची वेळ येणे काही लहान बाब नाही,पुतण्याचा खून करणाऱ्या आरोपी काकाला गावातच हत्येचा दंड देण्यास जनतेला चिथावणी देणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आधी गुन्ह्यात मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्यावर धारणी पोलिसांनी गुन्हा नोंदवित सर्व सबळ पुरावे न्यायालयात सादर केल्याने पटेल यांना सत्र न्यायालय व उच्च न्यायालय दोन्ही ठिकाणी जामीन नाकारण्यात आले, तब्बल ५ महिन्यानंतर अखेरीस पटेल पोलिसांना शरण आले, धारणी न्यायालयाने २ दिवसाची पोलीस कोठडी देवून नंतर न्यायालयीन

कोठडीत पाठविण्यात आले. यावरून कायदा हा सर्वांसाठी सारखा आणि कठोर आहे मात्र त्या कायद्याची अंमलबजावणी करणारा व्यक्ती कसा आहे यावर सर्व काही अवलंबून असते, धारणी पोलिसांनी केलेली ही कार्यवाही काही सामान्य नाही, ज्या पोलीस अधिकाऱ्याने प्रकरण नोंदविण्याची हिम्मत दाखविली हे काही सोपे नाही, अश्या राजकीय व्यक्तीवर गुन्हा नोंदविण्याची वेळ जेव्हा येतेय तेव्हा अनेक प्रकारचे राजकीय दडपण येतात त्यांना सामोरे जावून असे गुन्हे नोंदविणे आणि न्यायालयात बळकटीने टिकवून ठेवणे काही सोपे नाही,

कायदा हा प्रत्येकासाठी समान असतो कुणाला कायदा सोडत नाही, पण हे सर्व कायद्याची अंमलबजावणी करणारयावर अवलंबून असते, राजकुमार पटेल हे मेळघाटात प्रसिद्ध झोतात असलेले एकमेव नेता होते पण जेव्हा एखादा किती मोठा व्यक्ती गुन्ह्यावर गुन्हा करत असेल तर कर्तव्यदक्ष कायद्याची अमलबजावणी करणारा अधिकारी सोडणार नाही, याचे भान असणे आवश्यक आहे. आणि म्हणून पटेल यांना कारागृहात जावे लागले हा एकप्रकारे पोलीस विभागासाठी अभिमानाची  असून हा कायद्याचा विजय आहे, असे म्हणण्यास हरकत नाही,

राजकुमार पटेल हे केव्हा कारागृहातून बाहेर येणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र त्याच्या आल्यावर मेळघाटच्या राजकारणात नवीन अध्याय प्रारंभ होईल हे विसरता येणार नाही.

                                                           सौ. दुर्गाताई बिसंदरे (सिसोदिया) 

                                                                    प्रकाशक, प्रजामंच 

संपूर्ण