कर्नाटक बनावट ओळखपत्र सापडलेले फ्लॅट भाजपच्या माजी नगर सेविकेचा असल्याचे उघड

बंगळूरू प्रजामंच,9/5/2018 

बंगळूरूतील राज राजेश्वरी नगरमधील जलाहल्ली भागात बुधवारी सकाळी ज्या फ्लॅटमध्ये बनावट निवडणूक ओळखपत्रे आढळून आली होती. तो फ्लॅट भाजपाच्या माजी नगरसेविकेचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच काँग्रेसने या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी निवडणूक आयोगाकडे केल्याने भाजापाच्या अडचणी वाढल्या आहेत.

भाजपा-काँग्रेसच्या एकमेकांवरील आरोपांनंतर आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून या फ्लॅटची मालकीण मंजुळा नानजामरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मंजुळा यांनी सांगितले की, १९९७-२००२ या काळात त्या भाजापाच्या नगरसेविका राहिल्या आहेत. मात्र, काँग्रेससोबत आपला कुठलाही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. भाजपाने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केल्यानंतर लगेचच मंजुळा यांची प्रतिक्रिया आल्याने भाजपा आता चांगलीच अडचणीत आली आहे.

मंजुळा नानजामरी या भाजपाच्या बऱ्याच काळापासून नेत्या होत्या. मात्र, गेल्या २४ तासांतच भाजपाचे कर्नाटकचे प्रभारी प्रकाश जावडेकर यांनी त्यांना निरुपयोगी ठरवले, असा आरोप काँग्रेस नेते रणदीप सुर्जेवाला यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

दरम्यान, भूतकाळात १५ वर्षे मंजुळा नानजामरी या भाजपाच्या नगरसेविका राहिल्या असल्याचे भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी मान्य केले आहे. मात्र, त्यांचा आता भाजपाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच या प्रकरणाची चौकशी व्हावी असेही त्यांनी म्हटले आहे.

संपूर्ण