कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींना १०० कोटींची मानहानी नोटीस

बंगळूर, प्रजामंच 8/5/2018 

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि बी.एस. येदियुरप्पा यांच्याविरुद्ध १०० कोटींच्या मानहानीची नोटीस पाठवली. चुकीचे वक्तव्य करून प्रतिमा मलिन करण्याच्या दृष्टीने आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या काळात भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील काँग्रेस सरकारवर अनेक आरोप केले आहेत. मोदींनी या प्रकरणांत माफी मागावी, अशी मागणी सहा पानांच्या कायदेशीर नोटिसीमध्ये करण्यात आली. नोटिसीमध्ये भाजपच्या राज्य निवडणुकीतील जाहिरातींचा हवाला देण्यात आला आहे.

सिद्धरामय्या यांचे वकील आणि काँग्रेस प्रवक्ते व्ही.एस. उगरप्पा म्हणाले की, पंतप्रधानांनी त्यांच्या सभेत कर्नाटकचे सरकार १० टक्क्यांची असल्याचे म्हटले होते. इतकेच नव्हे राज्य सरकार हत्या करणारे असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी लावला होता. आरोपांमुळे राज्य सरकार आणि सिद्धरामय्यांची प्रतिमा खराब झाली आहे.

संपूर्ण