अब्जाधीशांना निवडून देणारे लखपती

निवडणूक लढवायची असेल तर लायक असून चालत नाही.तर तो कुबेर पुत्र असावा लागतो, धनशक्तीशिवाय निवडणूक नाही हे वर्तमान वास्तव असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक निवडणूक लढण्यासाठी सज्ज होत नाही. माल है तो लाल है नही तो सब बेहाल है हे निवडणुकीच समीकरण झालं आहे. घटनेचा कोरडा आव आणणारे राजकारणी घटनेने दिलेल्या अमूल्य मताचे मूल्य ठरविणार आहे. अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या अमरावतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निवडून येणारा अब्जाधीश तर निवडून देणारा मतदार लखपती होणार आहे. एक काळ असा होता तेव्हा राजा राणीच्या पोटातून जन्म घेत असे.नंतरच्या काळात देश बदलाकडे वाटचाल करत असताना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधानातून अमूल्य मतदानाचा अधिकार बहाल केला. आता राजा मतपेटीतून जन्म घेणार या संकल्पनेने देश सुखावला. पण अलीकडच्या काळात याला तिलांजली देण्याचे प्रकार अनेक निवडणुकीतून होत आहे. पूर्वी नेता म्हटला कि आयुष्य समाजसेवेत जायचे.टाकेचे घाव सोसूनही अनेकांना नेतृत्व करण्याची संधी मिळू शकली नाही. अनेकांनी आयुष्य खर्ची घातले .आता काळ बदलला, वेळ बदलली व विचारही बदलले.आता सत्तासुंदरीसाठी लायक असून चालत नाही. राजकारण हे धनदांडग्याचं झालं आहे.नेता होण्यासाठी आता पैसा लागतो आहे. “सबसे बडा रूपया” हे निवडणुकीच समीकरण झालं आहे.अमरावतीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीत पक्षनिष्टाता पैश्यासमोर गळून पडते हा सर्वानुभव आहे. एरवी तिकीट साठी साकडे घातल्या जायचे.पण या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विरोधात काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्ष्याला उमेदवारासाठी शोधा शोध करावी लागते,ही मंथनीय बाब आहे, विरोधात उमेदवारी अर्ज भरूच नये यासाठी पैसा पेरण्यात येते, अशी चर्चा ऐकण्यास मिळते, या सर्व गोष्टीचा प्रत्यक्ष पुरावा नसला तरी हे सर्व अप्रत्यक्ष रित्या घडत असते,घटनेने दिलेल्या अमूल्य मताचे मूल्य मतदारांना देऊन सत्तेचा मुकुट परिधान केल्या जातो.अब्जाधीश निवडून येणार व निवडून देणारा लखपती होणार हि लोकशाहीची देण नव्हे. असं मला वाटते.

माझे हि मत 

प्रभाकर लायदे

वरुड प्रजामंच तालुका प्रतिनिधी  

संपूर्ण