बलात्कार

बलात्कार हा शब्द उच्चारल्या बरोबर डोळ्याच्या भुव्या उंचावतात, याचे कारणच असे की सामान्यपणे बलात्कार या शब्दाचा वापर हा महिलांवर होणाऱ्या अत्याचाराशी निगडीत घडणाऱ्या घटनांशी जुळून वापरला जातो, म्हणून बलात्कार शब्दाकडे बघण्याचा दृतीकोन बदलतो, दृष्टीकोन बदलने सहाजिकच आहे कारण ‘बल’ म्हणजे शक्ती म्हणून बलाचा वापर करून केलेला अत्याचार म्हणजे बलात्कार असा होतो, बलाचे सुद्धा अनेक प्रकार सांगता येतील,आर्थिक बल,बौद्धिक बल,शारीरिक बल,भावनिक बल, मानसिक बल असे वेगवेगळे सांगता येईल, खरे तर सध्याच्या काळात अनेक प्रकारचे बलात्कार समाजात होतांना दिसतात, मात्र महिलांवर झालेल्या अत्याचाराला बलात्कार समजून गांभीर्याने घेतल्या जाते, व इतर बलात्कार हे सामान्य आणि साधारण असल्याची समज करून दुर्लक्ष करतो पण बौद्धिक, भावनिक,मानसिक हे बलात्कार सर्वात घातक आहे. असे असताना या बलात्कारांना समाजात संवेदनशील समजल्या जात नाही, मानव समाज आपल्या भावना वाणी व्दारे दुसऱ्याशी आदान प्रदान करतो भावना व्यक्त करतांना संवेदना किती प्रबळ आहे त्या प्रमाणे भावना व्दारे दुसऱ्याची मने जिंकल्या जाते. मग एकमेकांत विश्वास दृढ होतो.

सध्याच्या काळात भावनिक बलात्कार अधिक प्रमाणात होत असल्याचे प्रकार बघायला मिळत आहे. आज राजकीय वर्तुळातून अनेक घोषणा जनतेला आकर्षित आणि प्रलोबित करण्यास दिल्या जाते. राजकीय नेते आपल्या भाषणाच्या मंचावरून जनतेच्या भावना उत्तेजित करणाऱ्या घोषणा मोठ्या प्रमाणात करतात मात्र प्रत्यक्षात घोषणा ह्या घोषणाच म्हणून मर्यादित राहून जनतेच्या अपेक्षा भंग होण्याची अनेक उदाहरणे समोर आली. २०१४ लोकसभा निवडणुकीत काय आश्वासनांचा पाऊस धोधो पडला, हे सर्वानी अनुभवले मात्र त्या आश्वासनांचे काय झाले अस जर विचारलं तर आज म्हटल्या जाते वो तो चुनावी जुमला था, असे सहजतेने राजकीय नेते निवडून आल्यावर बोलून देतात मात्र जनता याच चुनावी जुमल्याला सत्य समजून इमानदारीने आपले मतदान करण्यात विसरत नाही,पण राजकीय नेते आपल्या आश्वासानाकडे पाठ फिरवितात,राजकीय नेते सहजतेने आपल्या जिभेला चौफेर फिरवितात आणि आपली खुर्ची कायम ठेवण्यासाठी धडपडत असतात ही बाब देशहिताची नाही.आज राजकीय समूहाचे फक्त खुर्चीवर कब्जा कसा कायम राहील, हाच सतत प्रयत्न दिसून येतो,

समाजाला मुलभूत सुविधा मिळावी म्हणून शासन काम करत असल्याचे सतत ऐकण्यास मिळते, असे असताना सुद्धा समाज मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. पाण्यासारख्या संवेदनशील मुलभूत सुविधाची काय दशा आहे. हे सर्वांसमोर आहे. मुलभूत सुविधांच्या विकास कामात होणारा भ्रष्टाचार हा एक प्रकारे समाजासोबत होणारा भावनिक बलात्कारच आहे. स्वंतत्र प्राप्तीला ७० वर्षे उलटल्या नंतरही जनतेला लहान लहान मागणीसाठी रस्त्यावर उतरावे लागते, विशेष बाब तर अशी की, जनतेच्या भावनेशी होणारा खेळ याला अजूनही समाज बलात्कार मानत नाही,

संपूर्ण