Home अकोला धृतराष्ट्र प्रशासनामुळे पनोरी येथील पठार नदीवरील पुल गेला वाहुन

धृतराष्ट्र प्रशासनामुळे पनोरी येथील पठार नदीवरील पुल गेला वाहुन

169
0

अकोट प्रजामंच देवानंद खिरकर,२/७/२०२०
अकोट तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेले दनोरी पनोरी गावाला जोडणारा पठार नदीवरील पुल पहिल्याच पाण्यात खरडून गेल्यामुळे पनोरी गावातील लोकांचा संपर्क तुटला आहे.गेल्या १ महिना आधी या पुलावर प्रशासना तर्फे खड्डे मध्ये फक्त मुरूम टाकण्यात आला होता.परंतु खाली माती टाकून वर तात्पुरता देखावा म्हणून मुरूम पसरवण्यात आला आहे.तो पुल पहिल्याच पावसाने वाहून गेला. या सर्व बोगस कामाची माहिती आमदार, जिल्हा परिषद सदस्यांना गावातील नागरिकांनी अगोदरच दिली मात्र त्याची कोणीही दखल घेतली नाही, गावातील लोकांचा संपर्क पुल तुटल्याने तुटणार याची जाणीव असताना दुर्लक्ष करण्यात आले.गावातील लोकांना बाहेर निघायला दुसरा पर्यायी मार्ग उपलब्ध नाही.गावातील लोकांच्या आरोग्य सारख्या अति निगडीत समस्या उदभविल्या तर जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रशासनाने लक्ष द्यावे.आणि पनोरी गावाला अडचणीतून बाहेर काढण्यास पर्याय द्यावा.अशी मागणी पनोरी येथिल कोळी महासंघ जिल्हा कार्यकर्ता गणेश बुटे,प्रभाकर बुटे,प्रवीण फुकट,गोकुळ बुटे,कुरुमदास बुंदे,बाळू भदे,विलास बुटे,दादाराव बुटे यांच्या कडून होत आहे.