Home आपला मेळघाट धारणीत नाभीक समाजाचे मुख्यमंत्र्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी निवेदन

धारणीत नाभीक समाजाचे मुख्यमंत्र्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी निवेदन

364
0

धारणी प्रजामंच,29/05/2020
सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक व्यवसाय बंद पडल्याने त्या व्यवसायिकांच्या कुटुंबावर उपासमारीचे वेळ येऊन टेपली आहे.मेळघाट हे क्षेत्र कोरोना साठी रेड झोन मध्ये नसल्याने धारणी शहरात इतर व्यावसायिकांप्रमाणे सलून व्यावसायिकांनाही दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी समस्त धारणी नाभिक समाजाद्वारे उपविभागीय अधिकारी मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
कोरोना विरोधातील लढ्यात प्रशासनाला साथ देण्यासाठी लॉकडाऊनच्या आधी पासून सलून व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून पुर्णकाळ दुकाने बंद राहिल्याने सलून व्यावसायिक आणि कारागीर यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ऐवढेच नव्हे तर त्यांच्या व कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे. आधीच नाभिक समाजाची आर्थीक स्थीती कमकुवत असून, रोजच्या कमाईवर कसाबसा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केल्या जाते. त्यात तब्बल साठ ते सत्तर दिवस दुकाने बंद पडल्याने आता जगणे कठीण झाल्याची व माहीती नाभीक समाजाणे निवेदनात उल्लेखित केली आहे.परिस्थितीचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, पन्नास लाखाचा विमा, व इतर मागनींचा समावेश आहे. निवेदन सादर करते वेळी धारणी नाभीक समाजाचे अध्यक्ष संजय वाठोळकर, उपाध्यक्ष राजेश पिंपळकर, सचिव भुषण पळसकर, गजानन भातुलकर, ऱाहुल पळसकर, योगेश राऊत, संदिप राऊत, अजय पिंपळकर, रोशन पळसकर, प्रफुल पळसकर,हितेश भातुलकर आदी उपस्थित होते.