Home अमरावती अमरावती जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे (IFSC) सेंटर बदली विरोधात फेसबुक आंदोलन

अमरावती जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे (IFSC) सेंटर बदली विरोधात फेसबुक आंदोलन

487
0

अमरावती, प्रजामंच,5/5/2020
मुंबई येथील (IFSC) सेंटर, गुजरात राज्याती गांधीनगर येथे स्थलांतरित करून केंद्र सरकारने हा महाराष्ट्रासह मुंबईवर केलेला एक प्रकारे अन्याय आहे. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून हा निर्णय चुकीचा असल्याचे कळवले आहे.
याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत याचा निषेध करण्यासाठी फेसबुकवरून आंदोलन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यार्थी शहराध्यक्ष आकाश हिवसे ,ऋग्वेद देशमुख,प्रथमेश ठाकरे ,मंगेश ढगे विद्यार्थ्यांना निषेधार्थ पोस्ट करण्याचे आव्हान केले
त्याला प्रतिसाद देत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांनी निषेधार्थ पोस्ट टाकल्यात केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फेसबुकच्या आंदोलनाद्वारे निषेध नोंदविण्यात आला. निषेध व्यक्त करणाऱ्या मध्ये ऋषिकेश चिकटे, विवेक खंडारे, संकेत ठाकरे,अभिषेक इंगळे, गौरव कदम, हिमांशु खोडे, भूषण अंबाडकर,ऋषीकेश बारबदे ,हर्षल भुयार, मृत्यु जय आवारे , आदित्य टा ले,अनिकेत पेठे, राम होले, ऋषिकेश देशमुख,रोशन हीरुळकर, यांचा समावेश होता.