Home अकोला संपत्तीच्या वादातून वडीलाने मुलावर गोळी झाडून केली हत्या

संपत्तीच्या वादातून वडीलाने मुलावर गोळी झाडून केली हत्या

734
0

अकोला,प्रजामंच, देवानंद खिरकार 03/02/2020 
अकोल्यातील जठारपेठ परिसरातील केला प्लॉटमधील इंद्रायणी मतिमंद शाळेजवळील ब्रम्हांडणायक अपार्टमेंटमध्ये आपल्या वडिलानेच पोटाच्या मुलावर बंदुकीची गोळी झाडून हत्या केली, मृतकाचे नाव मनीष भारती असून मारेकरी त्याचे वडील बाबा भारती आहेत. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून घटनास्थळी पोलिस अधिकारी पोहोचलेत, विशेष म्हणजे, बाबा भारती हे काँग्रेसचे नेते आहेत त्यांचा मुलगा राजेश भारती ही काँग्रेसचा मोठा नेता आहे
बाबा भारती व त्यांचा मुलगा मनीष भारती यांच्यामध्ये संपत्तीचा बऱ्याच वेळा वाद होत होता. या वादाने सोमवारी परिसीमा गाठली. मनिष भारती हा वडील बाबा भारती याच्या घरी धारदार शस्त्र घेऊन आला होता. त्याने वडिलांसोबत संपत्तीवरून वाद घातला. मुलाच्या हातात असलेले धारदार शस्त्र पाहून बाबा भारती यांनी बचावासाठी जवळ असलेली बंदुक काढली. मुलगा अंगावर येत असल्याची दिसतात त्यांनी त्या बंदूकीतून त्याच्या छातीमध्ये एक गोळी झाडली मुलगा मनीष हा जागीच ठार झाला.
ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले घटनास्थळी सिव्हील लाइन्स,रामदास पेठ यासोबतच शहर उपअधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व पोलिस दाखल झाले आहेत. दरम्यान,पोलिसांनी बाबा भारती यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान,घटनेबाबत बाबा भारती यांनी पत्रकारांशी सवांद साधून घटनेची तोंडी माहिती दिली. विशेष म्हणजे, बाबा भारती हे काँग्रेसचे नेते आहेत. तर दोन दिवस आधी मनीष भारती याला तीन महिन्यासाठी तडीपार करण्यात आली होते. मनीष भारती हा गुन्हेगारी स्वरूपाचा आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, पोलीस कार्यावाही प्रगतीपथावर आहे.