Home आपला मेळघाट अखिल भारतीय बलाई महासभाचे हळदी – कुंकू  कार्यक्रमाचे बामादेही येथे आयोजन

अखिल भारतीय बलाई महासभाचे हळदी – कुंकू  कार्यक्रमाचे बामादेही येथे आयोजन

537
0

चिखलदरा प्रजामंच31/01/2020
अखिल भारतीय बलाई महासभा, महाराष्ट्र शाखा, चिखलदरा व उन्नति महिला बचत ग्राम संघ, बामादेही यांच्या संयुक्त विद्यामाने हळदी – कुंकू व मान्यवरांचे जाहीर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन बामादेही येथे करण्यात आले यावेळी आठ बचत गटातील सर्व पदाधिकारी व सभासदांनी व अखिल भारतीय बलाई महासभा, शाखा चिखलदरा तालुक्याच्या महिला पदाधिकारी व सभासदांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभाग घेतला या मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला होता. उत्कृष्ट समाज सेवा करणाऱ्या महिलांचा यावेळी सत्कार सुद्धा करण्यात आला.
या कार्यक्रमात जि. प. अमरावती समाज कल्याण सभापती दयाराम काळे विभाग, चिखलदरा पंचायत समिती उपसभापती अविनाश मेटकर यांचे जाहीर सत्कार करण्यात आले.‍कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच मुन्नीबाई कासदेकर तर प्रमुख उपस्थिती म्हणून तालुकाध्यक्ष, महिला कांग्रेस लिलाबाई मरसकोले , अंगणवाडी पर्यवेक्षिका वानखडे मॅडम, अखिल भारतीय बलाई महासभा इंडिया राष्ट्रीय उपाध्यक्ष मिश्रीलाल झाडखंडे, चिखलदरा तालुका बलाई महासभा अध्यक्ष कृष्णा सतवासे, अमरावती युवा बलाई महासभा जिल्हाध्यक्ष राकेश झाडखंडे मुख्याध्यापक यावले,तसेच राजु भास्करे श्रीराम मावस्कर, APMC धारणी संचालक सोनाजी सावलकर, किशोर झाडखंडे, मनोज झाडखंडे, सुभाष आठवले.तसेच उन्नति महिला बचत ग्राम संघाच्या लताबाई झाडखंडे, विमलबाई मावस्कर,.इंदिराबाई झाडखंडे, कमलतीबाई झाडखंडे, उर्मिलाबाई झाडखंडे, कृषी सखी अनिताबाई झाडखंडे, पशु सखी शशिकलाबाई आठवले, सी. आर. पी श्रीमती. पार्वतीबाई धिकार, लिपिका लताबाई आठवले, अंगणवाडी सेविका अनिताबाई झाडखंडे,मालतीबाई कासदेकर यासोबतच कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी व शाळेतील विध्यार्थी, शिक्षक, शिक्षेत्तर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.