Home देश /विदेश ६९ व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं आईसोबत भोजन

६९ व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं आईसोबत भोजन

885
0

अहमदाबाद प्रजामंच 17/09/2019
६९ व्या वाढदिवसानिमित्त गुजरात दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मातोश्री हिराबेन यांचे आशीर्वाद घेतले. सरदार सरोवराचा दौरा केल्यावर पंतप्रधान मोदी निवासस्थानी दाखल झाले. तिथे त्यांनी मातोश्रींसह भोजन केलं. त्यानंतर मोदींनी आईची विचारपूस केली.
नरेंद्र मोदी मंगळवारी 69 वर्षांचे झाले आहेत. या खास दिवसानिमित्त त्यांनी सरदार सरोवरावर नर्मदा मातेची पूजा केली. मोदी नमामी देवी नर्मदे महोत्सवमध्ये सहभागी होत आहेत. या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला जाऊन सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली मोदींचा कार्यक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवडिया येथे जंगल सफारी, इको-टूरिज्म आणि कॅक्टस गार्डनला सुद्धा भेट दिली. यानंतर फुलपाखरू बागेत जाऊन फुलपाखरू सुद्धा उडवले. मोदी गुजरातमध्ये एका सभेला देखील संबोधित करणार आहेत.