Home देश /विदेश सामूहिक विवाह समाज परिवर्तनासाठी काळाची गरज-मा.आमदार बाबुलाल बछेर

सामूहिक विवाह समाज परिवर्तनासाठी काळाची गरज-मा.आमदार बाबुलाल बछेर

1002
0

दिल्ली येथे बलाई समाजाचे सामूहिक विवाह व सत्कार सोहळा संपन्न

दिल्ली प्रजामंच,20/11/2019 

समाजाला आर्थिक सकांटातून दूर ठेवण्यासाठी सामूहिक विवाह ही काळाची गरज झाली आहे, या गोष्टीला लक्षात घेता अखिल भारतीय बलाई महासभा यांच्या वतीने देशातील प्रत्येक राज्यात सामूहिक विवाह सोहाळा घेवून समाजाला आर्थिक कर्जबारीपासून अलिप्त ठेवण्याच्या दृष्टीने विचार करण्यात आला असून प्रत्येक राज्याने त्याची अमलबजावणी करण्याचे ठरविले आहे, याला अनुसरून अखिल भारतीय बलाई महासभा दिल्ली प्रदेश कडून भव्य सामूहिक विवाह व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी आमदार बाबूलाल बछेर,राष्ट्रीय उपाध्यक्ष मीरा वर्मा,रामधन जाटावत राष्ट्रीय सचिव मनमोहन पदम, राष्ट्रीय संयुक्त सचिव प्रभूदास बिसंदरे,सीमा महेश्वरी,मध्यप्रदेश प्रभारी गोपालसिंग, यशवंत मालविय, मध्यप्रदेश युवा अध्यक्ष दिलीपसिंग बामनिया, महिला अध्यक्ष माया मालविय, अनिल सिंदल, सामाजिल कार्यकर्ता राजेंद्र मालविय, सोलकी, मनोज परमार चुंनीलाल मांडरवाल, महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी प्रभारी नरेंद्र पंडोले,यासह मोठ्या सख्येने राजकीय नेते मंडळींनी उपस्थिती दर्शविली, यावेळी विविध सास्कृतिक कार्यक्रम आयोजित करून संस्कृती जतन वर भर देण्यात आले, राष्ट्रीय अध्यक्ष बाबूलल बछेर यांनी उपस्थित जनतेला संबोधित करतांना सांगितले की, समाजाला परिवर्तन कडे नेण्याची गरज आहे, बेटी बचाओ अभियानाला प्राधान्य क्रम देवून मुलींचे शिक्षण समाजाच्या हित योग्य असल्याने मुलींच्या शिक्षणावर भर द्यावे, देशातील ग्रामीण क्षेत्रात मुलींसाठी वसतीगृह, स्पर्धा परीक्षा केंद्र,समाज प्रबोधन उभारण्याचे काम लवकरच अखिल भारतीय बलाई महासभा करणार असल्याचे मत व्यक्त केले, देशाची राजधानी असणार्‍या दिल्ली राज्यात अखिल भारतीय बलाई महासभा शाखेने मागील चार वर्षापासून उत्कृष्ट कामे करून समाज विकासाचे काम केले आहे, दिव्यांग,अनाथ,विधवा सामूहिक विवाह सोहळा आदी कार्यक्रम दिल्ली शाखा कडून राबविण्यात येत आहे ही बाब अभिमानाचे असल्याचे मत बछेर यांनी व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिल्ली प्रदेश अध्यक्ष लक्षमी नारायण बंगाली,दिल्ली प्रदेश संरक्षक हरीचंद कालावत,वरिष्ठ सलाहकार हरिश चौहान, युवा मोर्चा अध्यक्ष ललित झोठवाल, प्रदेश महासचिव बनवारीलाल सिंगला,कोशाध्यक्ष राजकुमार बुडगाया,उपाध्यक्ष अनीता पालीवाल युवा विरसिंह खारडिया यांच्या सह दिल्ली प्रदेश कार्यकारणीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोठे श्रम घेतले,या कार्यक्रमाला महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, हरियाणा,उत्तरप्रदेश, बिहार, छत्तीसगड आदी राज्यातील पदाधिकारी व   हजारोच्या संख्येत समाज बांधव उपस्थित होते.