Home राजकीय राधाकृष्ण विखे पाटील यांचा आमदारकीचा राजीनामा । आमदार भारत भालके भाजपच्या वाटेवर?

राधाकृष्ण विखे पाटील यांचा आमदारकीचा राजीनामा । आमदार भारत भालके भाजपच्या वाटेवर?

1386
0

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधासभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला.

राजीनामा देण्यापूर्वी विखे पाटील यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार भारत भालके, आमदार जयकुमार गोरे, आमदार अब्दुल सत्तर यांच्यासोबत बैठक झाली.

आमदार भारत भालके आणि आमदार जयकुमार गोरे यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कारखान्याच्या कामा निमित्त भारत भालके हे मुंबईला गेले असल्याची माहिती असली तरी ते विखे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी गेले असल्याची चर्चा आहे. विखे पाटील यांच्या सोबत भारत भालके भाजपात जाणार का? हा प्रश्न पंढरपूर मतदार संघात चर्चिला जातोय आणि दुसरीकडे गेल्या आषाढी वारीला मुख्यमंत्र्यांना महापूजेपासून आमदार भालकेंनी रोखले होते. हि गोष्ट मुख्यमंत्र्यांना चांगलीच लक्षात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री भारत भालकेंना भाजपात प्रवेश देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमदारकीचा राजीनामा देऊन विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. येत्या दोन दिवसात त्यांचा भाजप प्रवेश होईल असे बोलले जात आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे किती आमदार भाजपात जाणार हे अजून स्पष्ट झाले नाही.

विधासभा अध्यक्षांनी राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश बापट, उन्मेष पाटील यांचे राजीनामे मंजूर केले.