Home देश /विदेश महाराष्ट्र व हरियाणा दोन राज्यांत विधानसभा निवडणूक जाहीर

महाराष्ट्र व हरियाणा दोन राज्यांत विधानसभा निवडणूक जाहीर

885
0

मुंबई,प्रजामंच,२१/०९२०१९
निवडणूक आयोगाने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन बहुप्रतीक्षित महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. महाराष्ट्रासह हरियाणा विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घेतली जाणार आहे. यात 21 ऑक्टोबरला मतदान आणि 24 तारखेला निकाल जाहीर केले जातील. निवडणुकीची ही संपूर्ण प्रक्रिया दिवाळीपूर्वीच संपणार आहे.
दोन्ही राज्यांत निवडणुकीच्या तारखा
27 सप्टेंबर रोजी नोटिफिकेशन जारी केली जाणार आहे.
4 ऑक्टोबरपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येईल.
5 तारखेला इच्छुक उमेदवारांच्या अर्जांची तपासणी केली जाईल.
7 ऑक्टोबरपर्यंत त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.
21 ऑक्टोबर रोजी दोन्ही राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होईल.
24 तारखेला मतमोजणी केली जाणार आहे.
सर्वच राजकीय पक्षांना आवाहन निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना प्लास्टिक बंदीचे आवाहन केले आहे. प्रचार सामुग्रीत त्यांनी प्लास्टिकचा वापर टाळावा. तसेच पर्यावरणपूरक अशा निवडणूक पार पाडण्यात सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे, 1 सप्टेंबर रोजी निवडणुकीच्या तारखांसाठी सुरक्षितता आणि इतर गोष्टींचा आढावा घेतला. तसेच दोन्ही राज्यांमध्ये निःपक्षपातीपणे निवडणुका होण्याची खात्री करून घेतली. दोन्ही राज्यांमध्ये पारदर्शक मतदानासाठी निवडणूक आयोगाने पूर्व तयारी केली आहे. यासाठी प्रत्येक ठिकाणी जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी तपास केला. महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार आहेत. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर तर हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ 2 नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर दोन्ही राज्यांमध्ये 24 तास पोलिस बंदोबस्त लावला जाईल असेही आयोगाने स्पष्ट केले. निवडणुकीत सोशल मीडियावर देखील निवडणूक आयोगाचे विशेष लक्ष राहणार आहे. राजकीय पक्ष, उमेदवारांकडून सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीने होईल याची काळजी आयोगाकडून घेतली जाईल.