Home महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे महाराष्ट्र झुकणार नाही, आम्ही शिवाजी महाराजांच्या संस्कारानुसार वागणारे- शरद पवार

दिल्लीच्या तख्तापुढे महाराष्ट्र झुकणार नाही, आम्ही शिवाजी महाराजांच्या संस्कारानुसार वागणारे- शरद पवार

1048
0

शिखर बँक घोटाळा प्रकरणी 27 सप्टेंबरला स्वत: ईडी कार्यालयात जाणार, राज्यावर शिवरायांचे संस्कार,  बाबासाहेबांच्या राज्यघनेटवर विश्वास

मुंबई,प्रजामंच,26/09/2019 

राज्य सहकारी बँकेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालक व अधिकाऱ्यांसह ७० जणांवर मंगळवारी गुन्ह दाखल केला. परंतु या बँकेशी कोणताही संबंध नसताना निवडणुकीच्या तोंडावर माझ्या विरोधात कार्यावाहीचे रचलेले डाव असून विधानसभेत याचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.‘अद्यापही ईडीकडून नोटीस मला आली नाही. पण माध्यमात नाव आल्याने मी स्वतःच शुक्रवारी दुपारी दोन वाजता ईडी कार्यालयात जाणार आहे.ते जो पाहुणचार देतील तोसुद्धा स्वीकारणार आहोत,’ अशी प्रतिक्रिया पवारांनी पत्रकार परिषदेत केली.‘दिल्लीच्या तख्तापुढे महाराष्ट्र झुकणार नाही, आम्ही शिवाजी महाराजांच्या संस्कारानुसार वागणार आहोत,’ असेही त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मी जवळजवळ महिनाभर मुंबईबाहेर असेन.त्या वेळी ईडीचे अधिकारी चौकशीला बोलावतील तेव्हा मी कदाचित उपस्थित राहू शकणार नाही. त्यामुळे गैरसमज होऊ नये म्हणून मी स्वतःच शुक्रवारी त्यांच्या कार्यालयात जाणार आहे.

माझ्यावर खटला दाखल होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी १९८० मध्ये जेव्हा मी जळगाव ते नागपूर अशी दिंडी काढली होती त्या वेळी मला अटक झाली होती.

फुले, शाहूंच्या विचाराने चालणारे आम्ही आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर विश्वास ठेवणारा मी आहे. त्यामुळे ईडीला सहकार्य करेन.  महाराष्ट्र हे छत्रपतींचे राज्य आहे. आमच्या लोकांवर त्यांचे संस्कार झाले आहेत. दिल्लीच्या तख्तासमोर झुकणे आम्हाला शिकवलेले नाही.

शरद पवारांचे नाव आले कसे ? – खडसे

भाजप नेते एकनाथ खडसे यांनी यावर प्रतिक्रिया देतांना संगितले की, मी विरोधी पक्षनेता असतांना राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याचे प्रकरण लावून धरले होते.राज्य बँक बरखास्त करून चौकशीसाठी मी आग्रह धरला होता. तेव्हाच्या आघाडी शासनाने चौकशीदेखील केली होती. परंतु त्यात शरद पवारांचे नाव नव्हते. आता मात्र ते कोठून आले ते तपासून पाहिले पाहिजे.’

‘या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश आघाडी सरकारनेच दिले होते,’ असे भाजप नेते सांगत आहेत. मात्र महाजनादेश यात्रेच्या वेळी बारामतीच्या सभेत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी ‘बुरे काम का बुरा नतीजा, सुन भाई चाचा हां भतीजा’ असे सांगत पवारांवरही कारवाईचे संकेत दिले होते, अशी चर्चा आता सुरू आहे.

एका पैशाचाही भ्रष्टाचार आम्ही केला नाही

‘मी एका पैशाचा घोटाळा केला नाही.शरद पवार तर संचालकही नव्हते, त्यांचा काहीही संबंध नाही. व्यवहार १२ हजार कोटींचा असतांना २५ हजार कोटींचा गैरव्यवहार कसा झाला? न्यायालयाने आमचे म्हणणे मांडायला संधी न देता एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिलेत. आम्ही आताही चौकशीला तयार आहोत. – अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते