Home आपला मेळघाट टोली गावात संपूर्ण प्रशासन तैनात,संपर्कात आलेल्या ३१ लोकांचे विलगिकरण

टोली गावात संपूर्ण प्रशासन तैनात,संपर्कात आलेल्या ३१ लोकांचे विलगिकरण

1990
0

धारणी प्रजामंच, 3/7/2020
मेळघाटातील धारणी तालुक्यात येणारया टोली गावात कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने तालुका प्रशासन सजग झाले असून माहिती मिळाल्या बरोबर आरोग्य विभाग, महसूल विभाग व पोलीस विभाग टोली येथे दाखल झाले आहेत, आवश्यक त्या प्रक्रिया करण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात आले असून संपूर्ण गावाला सॅनिटायझर करण्यात आले, ३० वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले, सोबतच या व्यक्तीचा संपर्कात आलेली ३१ लोकांना ही ताब्यात घेवून नजीकच्या शासकीय आश्रम शाळेत विलगीकरण करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त अजून कोणत्या लोकांशी संपर्क आला याचे तपास करण्यात येत आहे.
२८ जूनला घेण्यात आलेल्या धारणी येथील थ्रोट नमुना मध्ये ३० वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती मिळते, टोली गावाला लागून असलेली गावे बफर झोन घोषित करून टोली गावाला समाधानी क्षेत्र ( contentment zone) म्हणून राखीव करण्यात आले आहे,
बाधित व्यक्ति विलगीकरण केंद्रातून टोली गावात गेल्यावर किती लोकांच्या संपर्कात आला, लग्न संमारंभ सारख्या कार्यक्रम सहभागी झाल्याची तपासणी करण्यात येत असून धारणी शहरात राहणाऱ्या लोकांच्या संपर्कात आल्याची सखोल तपासणी प्रशासनाकडून करण्यात येत आहे, जेवढे लोक संपर्कात आले असेल त्या सर्वांना विलगीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आहे, धारणी प्रशासनाकडून या घटनेला गंभीरतेने घेत सर्व कार्यवाही काळजीपूर्वक करण्यात येत आहे.
टोली येथे तहसीलदार, पोलिस निरीक्षक, आरोग्य अधिकारी, सर्व आप आपली टीम घेवून तात्काळ पोहचल्याचे चित्र बघायला मिळाले.