Home महाराष्ट्र जय भीम, जय शिवाजीच्या नारा महाराष्ट्रात भाजप आणण्याचे प्रधानमंत्री मोदींचे आवाहन

जय भीम, जय शिवाजीच्या नारा महाराष्ट्रात भाजप आणण्याचे प्रधानमंत्री मोदींचे आवाहन

1162
0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित महा जनादेश यात्रेचा समारोप

नाशिक,प्रजामंच,19/09/2019
महा जनादेश यात्रेच्या समारोप करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ देखील फोडला. जय भीम आणि जय शिवाजी नारा देऊन राज्यातील जनतेला पुन्हा भाजपचे सरकार निवडून द्या असे आवाहन केले. सोबतच, पूर्ण बहुमतनसतांनाही 5 वर्षे सत्ता व्यवस्थित चालवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. यानंतर विरोधकांचा समाचार घेताना त्यांनी शरद पवार यांचे नाव घेऊन टीका केली.
काँग्रेस सरकारने सैन्य दलाकडे दुर्लक्ष केले – मोदी
पुढे बोलताना मोदी म्हणाले की, राष्ट्रवादीचे समर्थन असलेल्या काँग्रेस सरकारने सैन्यदलाकडे दुर्लक्ष केले. सैन्य दलाची बुलेटप्रुफ जॅकेटसह अनेक मागण्या पूर्ण केल्या नाहीत. पण आमच्या सरकारने लष्काराच्या बुलेट प्रुफ जॅकेटच्या मागणीसह अनेक मागण्या पूर्ण केल्या. जगभरातील 100 हून अधिक देशांमध्ये भारतात तयार करण्यात आलेले बुलेटप्रुफ जॅकेट निर्यात होत आहे.
जनतेच्या बहुमताने सरकार कशाप्रकारे निर्णय घेऊ शकते हे तुम्ही पाहिलंत – मोदी
पुढे बोलतांना मोदी म्हणाले की, 60 वर्षांनंतर एखादे सरकार दुसऱ्यांदा पहिल्यापेक्षा अधिक मतांनी निवडून आले. बहुमताने निवडून आलेले सरकार कसे निर्णय घेऊ शकतो हे तुम्ही पाहिलं आहेत. आमच्या सरकारने सांगितल्याप्रमाणे जम्मू-काश्मीरबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. जम्मू-काश्मीरमध्ये संविधान लागू करणे ही देशाची स्वप्नपूर्ती होती. काँग्रेसचे चुकीचे निर्णय काश्मीरच्या मुळावर उठले. पण आता आपल्याला नवीन काश्मीर निर्माण करायचा आहे असा नारा द्या. काश्मीरला पुन्हा स्वर्ग बनवायचा आहे. काश्मीरमध्ये हिंसा भडकावी असा प्रयत्न होत आहे. पण आता काश्मिरी जनता हिंसेपासून दूर राहणार आहे. आम्ही विकासाचे नवीन युग सुरू करण्यास कटीबद्ध असल्याचे मोदी म्हणाले.
शरद पवारांना शेजारील देश चांगला वाटतो
पंतप्रधान मोदींनी यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, शरद पवारांना शेजारील देश चांगला वाटतो. तेथील शासक त्यांना कल्याणकारी वाटतात. पण दहशतवादी कोठून येतात हे संपूर्ण महाराष्ट्र, देश आणि जगाला माहीत आहे. शरद पवारांसारख्या नेत्यांकडून काश्मीरसारख्या प्रश्नावर अपप्रचार होतो. मतांसाठी शरद पवारांच्या ओठी देशविरोधी भाषा येते. काँग्रेस, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेत्यांना राष्ट्रहित नाही. विरोधकांच्या बोलीने देशाची बदनामी होत असल्याचे मोदी म्हणाले.
सेवक म्हणून राज्यातील भ्रष्टाचार संपवण्याची जबाबदारी पूर्ण केली – मुख्यमंत्री
मोदींनी कलम 370 रद्द करून चांगली कामगिरी केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच मोदींनी पाच वर्ष काम करण्याची संधी दिली. हे 5 वर्ष प्रामाणिकपणाने सरकार चालवले. सेवक म्हणून भ्रष्टाचार संपवण्याची जबाबदारी पूर्ण केली.
दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे आमचे स्वप्न
पश्चिम महाराष्ट्रातील पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्यात आणण्याची आमची योजना आहे. यासाठी वॉटर ग्रीड प्रकल्पाची निर्मिती करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शरद पवार यांची मानसिकता ही राजेशाही
शरद पवारांची मानसिकता ही राजेशाही, आम्ही सेवक म्हणून राज्यासमोर हिशोब मांडला. या निवडणुकीत नरेंद्र मोदींची साथ आणि शिवरायांच्या आशीर्वादासोबतच आता शिवरायांचे वंशज देखील आमच्यासोबत आहेत. पुढील पाच वर्ष तुमची सेवा करण्याची संधी द्या. पुन्हा एकदा पारदर्शी सरकार चालवून तुमची सेवा करू असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी जनतेकडे महाजनादेश मागितला.
शिवशाही पगडी देऊन मोदींचे स्वागत
उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधनांना शिवशाही पगडी घालत त्यांचे स्वागत केले. यानंतर पंतप्रधानांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. शिवरायांची पगडी मिळणे हा माझा सन्मान आहे. पगडीची इज्जत राखण्यासाठी माझे आयुष्य पणाला लावण्यासाठी जनेतेने मला आशीर्वाद द्यावेत असे ते म्हणाले. दरम्यान फडणवीसांचा ऊर्जावान मुख्यमंत्री म्हणून मोदींनी उल्लेख केला. कोट्यवधी लोकांचा फडणवीसांना आशीर्वाद असल्याचे ते म्हणाले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, यात्रेचे पुण्य घेण्यासाठी मी समारोपाला हजेरी लावली. अपेक्षेप्रमाणे काम करणाऱ्यांनाच जनतेचा आशीर्वाद मिळणार. महाराष्ट्रात एकही मुख्यमंत्री पाच वर्षांपर्यंत टिकला नाही. फडणवीसांनी पाच वर्ष महाराष्ट्राची सेवा केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. स्थिर, प्रगतशील. विकसनशील सरकारच चालवून देवेंद्रेंनी महाराष्ट्राला नवीन दिशा दिली. पूर्ण बहुमत नसतानाही पाच वर्ष स्थिर सरकार चालवले. यापूर्वी अस्थिर सरकरामुळे विकास खुंटला होता. पण स्थिर सरकार नसतानाही मुख्यमंत्री विकास करत राहिले. आता सरकार घरोघरी पाणी पोहोचवणार यासाठी सरकार काम करत आहे. देशातील प्रत्येक घटकाला दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. योजनांची अंमलबजाणी फक्त प्रचारासाठी नाही. महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा लोडशेडींग पाहावी लागू यासाठी फडणवीस सरकारला निवडून देणे गरजेचे आहे.