Home आपला मेळघाट जनतेच्या डोळ्यात धूळ झोकून श्रेय लाटणे टाळा -माजी आमदार प्रभुदास भिलावेकर

जनतेच्या डोळ्यात धूळ झोकून श्रेय लाटणे टाळा -माजी आमदार प्रभुदास भिलावेकर

1336
0

धारणी प्रजामंच २४/०७/२०२०
मेळघाट विधान सभेचे भाजप माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी जनतेच्या डोळ्यात धूळ झोकून, खोट्या नौटंक्या करून श्रेय लाटण्याचे काम विद्यमान आमदार राजकुमार पटेल यांनी बंद करून जनतेशी निगडीत प्रश्न सोडवावे. अश्या प्रखर शब्दात प्रतिक्रीया दिली आहे, त्यामुळे मेळघाटच्या राजकीय वर्तुळात माजी आमदार प्रभुदास भिलावेकर पुन्हा चर्चेत आलेले आहे, धारणी पाणी पुरवठा योजनासाठी वाढीव रक्कम ऑगस्ट २०१९ मध्ये मंजूर झाली होती, मात्र विद्यामान आमदार राजकुमार पटेल आपण आताच पाणी पुरवठा योजना साठी वाढीव रक्कमेची प्रक्रिया करून निधी आणल्याचा खोटा देखावा करून उद्घाटनात दंग आहे दुसरीकडे शेतकरी युरिया खतासाठी मध्यप्रदेशात जाऊन खत आणत आहे, मात्र सोशल मिडीया वर उद्याच युरिया येत असल्याचा व्हिडीओ बनवून आ. पटेल यांनी शेअर करण्याला तब्बल २० दिवस उलटून गेले मात्र युरिया खताची समस्या कायम आहे,
माजी आमदार भिलावेकर म्हणाले मागील वर्षी युरिया एकूण १७०० मेट्रिक टन मेळघाट साठी अगदी वेळेवर आयात करण्यात आले होते मात्र यंदा आता पर्यंत मात्र ६०० मेट्रिक टन युरिया मेळघाटला मिळाले आहे, अजूनही १९०० मेट्रिक टन युरियाची आवश्यकता मेळघाटात आहे, हि युरिया वेळ गेल्यावर शेतकऱ्यांना मिळेल का असा सवाल माजी आमदार भिलावेकर यांनी उपस्थित करून आमदार पटेल यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
आमदार पटेल यांनी खरे विकास कामे करून दाखवावे आणि मग श्रेय घ्यावे, आम्ही केलेल्या कामांचे पुरावे आहे, हतरू, भागातील वन विभागाच्या हद्दीत येणाऱ्या रस्त्यांची कामे व ना हरकत मा.आ. भिलावेकर यांनी त्यांच काळात आणले आहे आता येथे ही श्रेय पटेल यांनी घेवू नये असे हि म्हणाले.