Home महाराष्ट्र कासेगांवच्या बी.सी.ए. व बी.एस्सी महाविद्यालयाचे विद्यापीठात यश

कासेगांवच्या बी.सी.ए. व बी.एस्सी महाविद्यालयाचे विद्यापीठात यश

976
0

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठा अंतर्गत मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बी.सी.ए. व बी.एस्सी.(ई.सी.एस.) परीक्षेत डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्री. विठ्ठल इन्स्टिटयूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित, इन्स्टिटयूट ऑफ कॉम्प्युटर अॅन्ड मॅनेजमेंट स्टडीज्, कासेगांव, पंढरपूर या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चांगलीच बाजी मारली.

पंढरपूरच्या विठठ्लाच्या पावननगरीत अग्रगण्य असलेल्या इन्स्टिटयूट ऑफ कॉम्प्युटर अॅन्ड मॅनेजमेंट स्टडीज्, या महाविद्यालयात आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्रत्येक वर्षी अव्वल येण्याचा मान मिळवला व हीच परंपरा कायम राखत यंदाच्या वर्षीदेखील मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बी. सी. ए. परीक्षेत विद्यार्थ्यांनी आपल्या बुध्दीची चमक दाखवली. बी. सी. ए. भाग-३ ची कु. अश्विनी गवळी ही ८३.३१ टक्के गुण मिळवत विद्यापीठात द्वितीय आली तर बी. सी. ए. भाग-३ चीच कु. स्वप्नाली एकमल्ली हीने ८२.०३ टक्के गुण मिळवून विद्यापीठात तृतीय येण्याचा पराक्रम केला.अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. एन. उपासे यांनी दिली. महाविद्यालयात घेण्यात आलेल्या प्रॅक्टीस सेशन, अभ्यासक्रमाचे रिव्हीजन, सराव परीक्षा, विद्यार्थी विकास कार्यक्रम आदी उपक्रमांमुळे यंदाही महाविद्यालयाने उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम राखली. अशीच परंपरा कायम राहील असे आश्वासन कॅम्पस प्रमुख डॉ.जयश्री चव्हाण यांनी दिले.

यावेळी विध्यार्थ्यांच्या यशाबदद्ल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे, अध्यक्ष बी. डी. रोंगे, उपाध्यक्ष एच. एम. बागल, विश्वस्त दादासाहेब रोंगे तसेच विभागप्रमुख प्रा. समीर मुलाणी, बी. सी. ए. भाग-३ च्या वर्गशिक्षिका श्रीमती.स्नेहल भोसले, बी.एस्सी. (ई.सी.एस.)-३ चे वर्ग शिक्षक जगन्नाथ अर्जून, अन्य प्राध्यापकांनी व सर्व पालकांनी अभिनंदन केले.