Home अमरावती आज के शिवाजी नरेंद्र मोदी”या पुस्तकाचे लेखक गोयल यांनी जनतेची माफी मागावी...

आज के शिवाजी नरेंद्र मोदी”या पुस्तकाचे लेखक गोयल यांनी जनतेची माफी मागावी – दुर्गा बिसंदरे

593
0

धारणी प्रजामंच 14/01/2020

महाराष्ट्रचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणार्‍या लेखक गोयल व भाजप पार्टीने जनतेची माफी मागावी अन्यथा आंदोलन करू अश्या स्वरूपाचे निवेदन धारणी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस तालुक्का अध्यक्ष दुर्गाताई प्रभूदास बिसंदरे यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत अमरावती जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

मी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा उल्लेख “आज के शिवाजी नरेंद्र मोदी” म्हणून पुस्तकात करून आमच्या महाराष्ट्रचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान आहे. छ्त्रपती शिवाजी महाराजांची तुलना आज जगात कुणाशीच होऊ शकत नाही इतके महान राजे आहेत॰ महाराजांसोबत तुलना करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे असून सर्व महाराष्ट्रातील जनतेचा हा अपमान आहे. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे कदापिहि सहन करणार नाही. या पुस्तकाच्या लेखकाचा व पाठीशी घालणारा भाजप पक्षाचा निषेध धारणी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस कडून करण्यात येत आहे. त्वरित या पुस्तकावर बंदी आणावी व लेखक गोयल तसेच भाजप पक्षाने जनतेची सार्वजनिक जाहीर माफी मागावी. अन्यथा आम्ही आंदोलन तीव्र करू॰ असे निवेदनात उल्लेख केला असून अमरावती राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसचा संगीताताई ठाकरे यांच्या नेतृत्वात जिल्हा कचेरीवर निषेध नोंदविण्यात येत आहे.