Home अमरावती अ.भा.बलाई महासभा महाराष्ट्र प्रदेश सचिव दिनेश बछले तर युवा प्रदेश अध्यक्ष उपेन...

अ.भा.बलाई महासभा महाराष्ट्र प्रदेश सचिव दिनेश बछले तर युवा प्रदेश अध्यक्ष उपेन बछले यांची निवड

466
0

अमरावती प्रजामंच प्रशांत पंडोले,21/07/2020
अमरावती जिल्ह्यात येणाऱ्या चिखलदरा तालुक्यातील सलोना येथे अखिल भारतीय बलाई महासभेच्या महाराष्ट्र प्रदेश कमेटीची कोअर कमेटीची सभा आयोजीत करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सहदेव बेलकर यांच्या अध्यक्षते खाली तर राष्ट्रीय उपाध्यक्ष मिश्रीलाल झाडखंडे व राष्ट्रीय सचिव प्रभुदास बिसंदरे यांच्या प्रमुख उपस्थित सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय बलाई महासभा, महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून दिनेश बछले तर युवा प्रदेश अध्यक्ष उपेन बछले यांची निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले, यावेळी कोरोना विषाणू वर समाजाला प्रबोधन करून शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन काटेकोरपणे कसे करता येईल यासाठी समाजातील प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियासह, पर्यायी साधनाने समाज प्रबोधन करावे, जेणे करून कोरोना विषाणू वर मत करता येईल. सोशल डिस्टन्सचे पूर्णपने पालन यावेळी करण्यात आले, लवकरच महाराष्ट्र प्रदेश कार्याकारिणी जाहीर करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सहदेव बेलकर यांनी दिली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय बेलकर, विजय नांदुरकर,प्रदेश महिला अध्यक्ष प्राप्ति श्रीमंत माने, अमरावती जिल्हा अध्यक्ष संजय हरसुले, अमरावती जिल्हा युवा अध्यक्ष राकेश झाड़खंडे,प्रदेश मीडिया प्रभारी कुलदीप हरसूले, महाराष्ट्र प्रदेश संघठन मंत्री रोशन आठवले उपस्थित होते.