Home देश /विदेश बेटी बचाव व वृक्षारोपण अभियान काळाची गरज- दिलीपसिह बामणीया

बेटी बचाव व वृक्षारोपण अभियान काळाची गरज- दिलीपसिह बामणीया

175
0

दाहोद प्रजामंच,22/08/2021
अखिल भारतीय बलाई महासभा दिल्लीचे संस्थापक एवंम राष्ट्रीय अध्यक्ष बाबूलाल बछेर यांच्या निर्देशानुसार अखिल भारतीय बलाई महासभाच्या युवा ब्रिग्रेड कडून गुजरात राज्यातील दाहोद जिल्ह्यातून बेटी बचाव व वृक्षारोपण अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली असून राज्यात या अभियानाला बलाई समाजाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळावे अशी अपेक्षा आहे. अखिल भारतीय बलाई महा सभा युवा राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपसिंह बामणीया यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे उदघाटन पार पडले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजस्थान प्रदेश सलाहकार बोर्डचे प्रदेश अध्यक्ष सी.एम. वर्मा, मध्यप्रदेश राज्याचे युवा प्रदेश अध्यक्ष अनिल सिंदल, भारतीय टायगर पार्टीचे जिल्हा अध्यक्ष देवेंद्र मेंढा, भारतीय टायगर सेना जिल्हा महामंत्री सुरेश भुरिया, भारतीय ट्रायबल टायगर सेना जिल्हा अध्यक्ष शैलेशभाई मेंढा आदी मंचावर उपस्थित होते,
या प्रसंगी अखिल भारतीय बलाई महा सभा युवा राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपसिंह बामणीया यांनी उपस्थित समाज बांधवांना संबोधन करतांना सांगितले की, देशात मुलींची संख्या झपाट्याने कमी होत असून समाजाचा समतोल कायम ठेवायाचा असेल तर बेटी बचाव अभियानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्याची गरज आहे, त्या सोबतच सध्या अधिक वृक्ष कटाई झाल्याचे पर्यावरणाचे पूर्णपणे समतोल बिघडलेला आहे. त्यामुळे कुटुंब संख्येप्रमाणे वृक्ष लागवड करून पर्यावरण रक्षण करणे प्रत्येक समाज घटकाचे प्राथमिक कर्तव्य आहे. बेटी बचाव व वृक्षारोपण हे दोन्ही उपक्रम समाजला अतिशय पूरक असून या वर सर्वाधिक समाज अवलंबून आहे, त्यामुळे हि दोन्ही समाज उपयोगी कामे प्रत्येक व्यक्तीने करावे असे यावेळी बामणीया यांनी उपस्थितांना आव्हान केले.
कार्यक्रम आयोजनास गुजरात राज्याचे युवा अध्यक्ष राजेश सिसोदिया यांच्या सह इतर पदाधिकाऱयांनी सहकार्य केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने बलाई समाजातील महिला पुरुषांनी उपस्थिती दर्शविली